जुन्नर -हुतात्मा नाग्या कातकरी स्मृतीदिनानिमित्त मानवंदना    

junnar
junnar

जुन्नर - हुतात्मा नाग्या महादू कातकरी या क्रांतिकारकाच्या स्मृतीदिना निमित्त माणिकडोह-कातकरीवस्ती ता.जुन्नर येथे आदिवासी विचार मंच, महाराष्ट्र-जुन्नर यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते मधु हिलम, वसंत वाघ, शिरपा जाधव, बाबू हिलम, काळू वाघ, नंदू कोथेरे, शिवाजी मडके, नवनाथ रघतवान, लता दगडू वाघ, पिंटी राजू मुकणे, चिंगाबाई वाघ, शांताबाई पवार आदींच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करून मानवंदना देण्यात आली. 

बाळासाहेब दिघे व सचिन नांगरे यांच्या नाग्या वंदना गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या क्रांतिकारकाविषयी माहिती देताना मोहन उंडे म्हणाले, हुतात्मा नाग्या महादू कातकरी हे रायगड जिल्ह्यातील उरण जवळ चिरनेरच्या उठावातील मोठे क्रांतिकारक होत. हा जंगल सत्याग्रह देशभर गाजला आदिवासींचे जंगलावरील हक्क अधिकार ब्रिटिशांनी काढून घेतले त्यावर देशभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या त्यात उरण जवळ अक्कादेवीच्या डोंगरावर हजारो शेतकरी सत्याग्रहासाठी जमले होते. हा देश आदिवासींचा हे जंगल आदिवासींचे असा ठणकावून सांगणारा अत्यंत गरीब कुटुंबातील परंतु अत्यंत निडर व धाडसी असा वीर नाग्या कातकरी आंदोलन करताना पोलिसांच्या गोळीबारात धारातीर्थी पडला. यात नाग्या कातकरीसह, रामा बामा कोळी, हसुराम बुधोजी धरत, धाकू गवत्या फोकेरकर, आनंद माया पाटील, आलू म्हात्रे, रघुनाथ न्हावी, परशुराम पाटील, काशिनाथ पाटील अशा नऊ जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. हा दुर्लक्षित इतिहास समाजासमोर आणण्याचे काम आदिवासी विचार मंच करत आहे.

यावेळी नंदुरबार येथील भाईदास पावरा यांनी पावरी भाषेतून नाग्या कातकरीचा जीवनपट उलगडला. आदिवासी संस्कृती निसर्गपूजक आहे व जगातील महान संस्कृती आहे तिचा सर्व समाजाने अवलंब करावा असे प्रतिपादन केले. सूत्रसंचालन अंकुश साबळे यांनी केले. आभार दगडू वाघ यांनी मानले. ज्ञानदेव दाभाडे, सचिन नांगरे, सूर्यकांत विरणक, जोशी सर, डामसे सर, व आदिवासी विचार मंचच्या सहकारी यांनी कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com