भारीप बहुजन महासंघ कार्यकर्ता मेळावा संपन्न

रमेश मोरे
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

जुनी सांगवी - जुनी सांगवी येथे भारिप बहुजन महासंघ सांगवी शाखेच्या वतीने रविवार ता.२३ जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळेगुरव परिसरातील कार्यकर्ता मेळावा पार पडला. शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शाखा फलकाचे अनावरण करून कार्यकर्ता मेळाव्याची सुरूवात करण्यात आली.

महासंघाचे जेष्ठ नेते वसंतदादा साळवे, प्रदेश सरचिटणीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. साळवे म्हणाले, लाचारीचे राजकारण करणा-या नेत्यांना धडा शिकवुन बहुजनांना सोबत घेवुन बहुजनांची लढाई लढणा-या स्वाभिमानी नेतृत्व असलेल्या अँड.प्रकाश आंबेडकर यांच्या विचाराने कार्यकर्त्यांनी काम करावे.यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे नेते रहिमभाई सय्यद,पक्ष प्रवक्ते के.डी.वाघमारे, डी.व्ही.सुरवसे ईत्यादींनी कार्यकर्ता व चळवळ या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी नवनियुक्त कार्यकारणी सदस्यांना उपस्थितांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड.पी.आर.गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाखा अध्यक्ष धनंजय कांबळे होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनायक गायकवाड यांनी केले. तर आभार डॉ.विलास कांबळे यांनी मानले.मेळावा यशस्वितेसाठी बलभिम रोकडे, अमित कांबळे, प्रविण निकाळजे, दिनेश ओव्हाळ आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: The Haveli Bahujan Mahasangh Worker's Meet concludes