हवेलीतील १५ गावांची रिंगरोडच्या भूसंपादनाची मोजणी पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Ring Road

महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या पूर्व भागातील रिंगरोडच्या हवेली तालुक्यातील १५ गावांच्या मोजणीचे काम पूर्ण झाले आहे.

हवेलीतील १५ गावांची रिंगरोडच्या भूसंपादनाची मोजणी पूर्ण

पुणे - महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या पूर्व भागातील रिंगरोडच्या हवेली तालुक्यातील १५ गावांच्या मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. त्या जमिनींचे मूल्यांकन निश्‍चित करण्यासाठीचा प्रस्ताव नगर रचना विभागाकडे पाठविला आहे. त्यामुळे पश्‍चिम भागाप्रमाणेच पूर्व भागातील रिंगरोडच्या भूसंपादनाचा मोबदला निश्‍चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या चार तालुक्‍यांतून जाणार हा रस्ता सुमारे ६२ किलोमीटर लांबीचा असणार आहे. पूर्व भागातील रिंगरोडच्या सर्वेक्षणाचे काम गेल्यावर्षी सुरू केले. नगर रस्त्यावरील मरकळपासून तो सुरू होणार असून पुणे-सातारा रस्त्यावरील वरवे बुद्रूक येथे येऊन मिळणार आहे. एकूण ४३ गावातून हा रिंगरोड जातो. या रिंगरोडच्या मार्गिका निश्‍चित करण्याचे आदेश काढण्यास राज्य सरकारकडून सहा महिने उशीर झाला. त्यामुळे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या रिंगरोडच्या मार्गिकेच्या मोजणीचे काम सुरू झाले. त्यामध्ये हवेली तालुक्यातील १५ गावांतून हा रिंगरोड जातो. या सर्व गावातील मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. आता त्या जमिनींचे मूल्यांकन निश्‍चिती करण्यासाठीचा प्रस्ताव नगर रचना विभागाकडे पाठविला आहे.

रिंगरोडचे काम पूर्व आणि पश्‍चिम असे दोन टप्प्यात करणार आहे. पश्‍चिम भागातील मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. तसेच त्यास राज्य सरकारकडून मान्यता मिळाली असून या मार्गाच्या भूसंपादनाचे कामही सुरू केले आहे. त्यापाठोपाठ पूर्व भागातील रिंगरोडचे कामही गतीने सुरू केले आहे.

पूर्व भागातील रिंगरोड हा चार तालुक्यातून जातो. त्यामध्ये हवेली तालुक्यातील १५ गावांतून तो जातो. या सर्व भागातील रिंगरोडच्या जमिनीच्या मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. आता जमिनींच्या भूसंपादनाचा मोबदला ठरविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठीचा प्रस्ताव नगर रचना विभागाकडे पाठविला आहे.

- संजय असवले, प्रांताधिकारी, हवेली

 • पुणे -मुंबई द्रुतगती महामार्ग - नाशिक, सोलापूर आणि सातारा महामार्गाला जोडणारा

 • खेड, हवेली, पुरंदर आणि भोर तालुक्यांतून जाणार

 • चार तालुक्यातील ४६ गावांतून हा रिंगरोड होणार

 • सहा पदरी महामार्ग- एकूण ७ बोगदे, ७ अंडरपास, दोन नदीवरील आणि दोन रेल्वे मार्गावरील ओलांडणी पूल

या गावांतून जाणार रस्ता

 • खेड : खालुंब्रे, निघोजे, मोई, कुरळी, चिंबळी, केळगाव, आळंदी, चऱ्होली खुर्द, धानोरे, सोळू, मरकळ, गोळेगाव

 • हवेली : तुळापूर, भावडी, लोणीकंद, पेरणे, बकोरी, डोंगरगाव, वाडे बोल्हाई, गावडेवाडी, मुरकुटेनगर, भिवरी, पेठ, कोरेगाव मुळ, शिंदवणे, वळती, तरडे, आळंदी म्हातोबाची.

 • पुरंदर : सोनोरी, काळेवाडी, दिवे, हिवरे, चांबळी, कोडीत खुर्द, गराडे

 • भोर : कांबरे, नायगाव, केळवडे

असा आहे पूर्व भागातील मार्ग

 • ६६ किलोमीटर - एकूण लांबी

 • ११० मीटर - एकूण रुंदी

 • ८५९.८८ हेक्टर - भूसंपादन करावे लागणार

 • १४३४ कोटी - भूसंपादनसाठी अंदाजे खर्च

 • ४ हजार ७१३ कोटी - महामार्ग बांधणीचा खर्च

Web Title: Haveli Tahsil 15 Villages Ringroad Land Acquisition Counting Complete

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..