Pune-Municipal
Pune-Municipal

‘एचसीएमटीआर’ची निविदा रद्द करा

पुणे - उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गाच्या (एचसीएमटीआर) निविदा तब्बल ४४ टक्के जादा दराने आल्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी महापालिकेकडे केली आहे. 
पाच हजार कोटी रुपयांचा रस्ता साडेसात हजार कोटी रुपयांचा झाला कसा, किमान तीन कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत सहभागी होणे अपेक्षित असताना दोनच कंपन्यांच्या निविदांवर प्रक्रिया कशी सुरू आहे, असे अनेक प्रश्‍न या संस्थांनी उपस्थित केले आहेत. त्यामुळे ‘एचसीएमटीआर’ची निविदा प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 

शहरातून वर्तुळाकर रस्ता तयार करण्यासाठी महापालिकेने ‘एचसीएमटीआर’ प्रकल्प हाती घेतला आहे. हा रस्ता सुमारे ३६ किलोमीटर लांबीचा आहे. या चार पदरी रस्त्यावरून बीआरटी मार्ग तयार करून दोन लेन चारचाकी वाहनांसाठी खुला करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. संपूर्ण रस्ता ‘एलिव्हेटेड’ (खांब उभारून त्यावर रस्ता तयार करणे) होणार आहे. महापालिकेने त्यासाठी तीन महिन्यांपूर्वी निविदा मागविल्या; परंतु पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे  त्यांना तीन वेळा मुदतवाढ द्यावी लागली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com