पुणे : सफाई कर्मचारीची मुलगी झाली प्रशासकीय अधिकारी

अजित घस्ते 
शनिवार, 1 डिसेंबर 2018

 पुणे (सहकारनगर) :जीवनात यशस्वी होण्यासाठी सोभावलताचे वातावरण अनुकूल असावे लागते. अनुकूल वातावरण आणि पाठींबा असेल तर कोणालाही यश संपादन करता येते. मात्र, पर्वती दर्शन येथील साईबाबा झोपडपट्टीतील गरीब कुटुंबातील मोनिका रामदास कांबळे (वय.23) या हिची एमपीएससी स्पर्धा परीक्षेतून 'कर निर्धारण अधिकारी' (उपमुख्य अधिकारी) पदी निवड झाली असून खडतर परस्थितीवर मात करून यश संपादन केले आहे.

घरची परिस्थिती हालाकिची असल्यामुळे आई धुणी-भांडी काम करीत असून वडील मनपाचे सफाई कामगार आहेत. घरामध्ये आई, वडील आजी असून मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे. लहान भावाने चार महिन्यांपूर्वी आत्महत्या केल्याने घरात दुःखाचे संकट कोसळले होते. अशा वेळी एमपीएससी स्पर्धा परीक्षातून मोनिकाची उपमुख्य अधिकारी पदी निवड झाल्याने दुःखाचा डोंगरवर फुंकर घातली.  या निवडीमुळे नातेवाईक व घरच्यांना आनंदाचे वातवरण निर्माण झाले. परिसरातील नागरिक यानिवडीने मोनिका व तिच्या आई, वडिलांचे कौतुक करीत गुच्छ व पेढे देऊन सत्कार करीत आहेत.

 मोनिका कांबळे म्हणाली, ''एमपीएससी स्पर्धा परीक्षाची पूर्व परीक्षा पास झाल्याने मुख्य परिक्षाचा अभ्यास करीत असताना अचानक लहान भाऊ आदित्य याने आत्महत्या केल्याने घरात दुःखाचा डोंगर कोसळला होता. आयुष्य संपले असे घरच्यांना वाटत होते आणि पुढे काही करण्याची इच्छा राहिली नाही. परंतु वडिलांच्या मित्र प्रशांत गवळी यांनी मार्गदर्शन केले आणि विश्वास दिला .मुख्य परीक्षेचा पंधरा दिवस अभ्यास केला आणि हे यश संपादन केले. यापुढे असाच अभ्यास चालू ठेऊन उपजिल्हाधिकारी होण्याची इच्छा आहे.

रोहिदास कांबळे( वडील) म्हणाले, '' महानगरपालिका सफाई कामगार म्हणून सहकारनगर-धनकवडी क्षेत्रीय कार्यालय येथे काम करीत असून पत्नी धुणी-भांड्याचेे काम करते. चार महिन्यांपूर्वी 19 वर्षाच्या मुलाने तरुण अचानक आत्महत्या केल्याने घरामध्ये दुःखाचा डोगर कोसळला. मित्र मंडळी व नातेवाईक सांत्वन करण्यासाठी येत होते. मुलीच्या या यशाने आता जी लोक सांत्वन करीत होते आता तेच लोक शुभेच्छा देण्यासाठी येत आहे यामुळे फार मोठा आनंद झाला आहे.

Web Title: he daughter of the cleaning staff has become Administrative Officer