पुणे: काज-बटणचे काम करून दहावीत रात्रशाळेत पहिला

SSC student
SSC student

पुणे : टेलरच्या दुकानात काज व बटण लावण्याचे काम करून पवनकुमार गोरंटला याने जमेल तसा दहावीचा अभ्यास केला अन्‌ कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर त्याने रात्रशाळेत पहिला क्रमांक पटकावला. त्याला 63.80 टक्के गुण मिळाले आहेत. 

पवनकुमारची घरातील परिस्थिती बेताची आहे. वडील टेलरच्या दुकानात काम करतात. आर्थिक चणचणीमुळे तोसुद्धा टेलरकडे काज-बटण लावण्याचे काम करू लागला. त्याच्या कुटुंबाबरोबर तो आधी सोलापूरला राहत होता. तेथे राहून घरातील खर्च भागवला जात नव्हता, त्यामुळे त्याचे कुटुंब पुण्याला राहायला आले. पवनकुमारचे आठवीपर्यंतचे शिक्षण सोलापूरला झाले आहे.

पुण्याला आल्यावरही शिक्षणाची ओढ त्याला स्वस्थ बसू देईना. त्यामुळे त्याने सरस्वती मंदिर संस्था, पूना नाइट हायस्कूल या रात्रशाळेत दहावीला प्रवेश घेतला. दिवसभर काज-बटण लावण्याचे काम आणि संध्याकाळी अभ्यास करायचा. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याला काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यातूनही त्याने अभ्यासाची जिद्द सोडली नाही. त्यामुळे त्याने दहावीच्या परीक्षेत हे यश मिळवले आहे. पुढे आयटीआय करून त्याला चांगली नोकरी करण्याची इच्छा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com