जप्त वाहनांची डोकेदुखी

जप्त वाहनांची डोकेदुखी

पुणे - शहराची सुरक्षितता आणि गल्लीबोळ मोकळे राहावेत, यासाठी महापालिकेने शहरात ठिकठिकाणी धूळ खात पडलेल्या दीड हजार वाहनांवर कारवाई करीत ती ताब्यात घेतली; त्यातील जवळपास सहाशे वाहनांच्या मालकांचा थांगपत्ताच लागला नाही. त्यामुळे या वाहनांचा लिलाव करण्याचे धोरण अतिक्रमण विभागाने आखले आहे.  

ही वाहने िकता येणार नसल्याचा अभिप्राय महापालिकेच्याच विधी विभागाने दिला आहे. परिणामी, ही वाहने कुठे उभी करायची ? तेवढी जागा कुठे सापडणार, या चिंतेत असलेल्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. 

दरम्यान, विधी विभागाच्या अभिप्रायावर आक्षेप घेत अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी पोलिस आयुक्तांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू होण्याची आशा आहे. महापालिकेच्या दोन विभागातील मतभेदांवर पोलिस आयुक्त तोडगा काढणार का, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. शहरातील विविध रस्त्यांवर महिनोंमहिने काही वाहने पडून असल्याने ती वाहतुकीला अडथळा ठरत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे दुचाकींसह चारचाकी आणि अन्य प्रकारची वाहने ताब्यात घेण्यात आली होती. कारवाईतील दीड हजार वाहनांपैकी सहाशे वाहने बेवारस असल्याचे स्पष्ट झाले असून, उर्वरित वाहने दंड आकारून सोडली आहेत. सातत्याने आवाहन करूनही सहाशे वाहनमालकांनी महापालिकेशी संपर्क साधलेला नाही. त्यामुळे या वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय अतिक्रमण विभागाने घेतला; परंतु वाहनांचा लिलाव करण्याचा अधिकार पोलिसांना असल्याने ही प्रक्रिया अतिक्रमण विभागाला करता  येणार नाही, असे विधी सल्लागारांनी स्पष्ट केले आहे.

बेवारस वाहनांची संख्या मोठी आहे. त्यांच्या पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्याने त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. विधी विभागाच्या अभिप्रायानुसार लिलावाबाबत पोलिस आयुक्त के. वेंकटेशम यांच्याशी चर्चा केली जाईल. त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल.
- माधव जगताप, अतिक्रमण विभागाचे प्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com