पुण्याचे ‘गुरुजी’ ठरविणार शिक्षक आमदार

Voting
Voting

विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघात विक्रमी ७३.०४ टक्के मतदान झाले. मतदानाच्या टक्केवारीत पुणे वगळता कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या चारही जिल्ह्यांत ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मतदान झाले. पुण्यात ५८.५४ टक्के मतदान झाले असले तरी तब्बल १८ हजार ८४९ शिक्षकांनी मतदान केले आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत किमान सात हजार मतदान जास्त झाले आहे. त्यामुळे ज्या उमेदवाराच्या पारड्यात पुण्यातील ‘गुरुजीं’चे जास्त मतदान पडणार आहे, त्यांचा विजय आणखी सोपा होणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिक्षक मतदारसंघातात ३५ उमेदवार रिंगणात आहेत. यात महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर, भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार, विद्यमान आमदार व अपक्ष उमेदवार दत्तात्रेय सावंत यांच्यामध्ये प्रमुख लढत होत आहे. २०१४ च्या निवडणुकीत शिक्षक मतदारसंघात ५२ टक्के मतदान झाले होते. त्यात दत्तात्रेय सावंत यांनी बाजी मारली होती. आता जवळपास २१ टक्के जास्त मतदान झाल्याने त्याचा फायदा कोणाला होणार, याची उत्सुकता लागली आहे. 

कोरोनामुळे शाळा, महाविद्यालय बंद असल्याने व शिक्षक पूर्ण क्षमतेने कामावर नव्हते. त्यामुळे शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांना एवढ्या मोठ्या मतदारसंघात मतदार शिक्षकांपर्यंत पोचणे आव्हानात्मक बनले होते. प्रचारात गटबाजी झाली असली तरी प्रत्यक्षात मतदान मोठ्या प्रमाणात झाले आहे. पुणे जिह्यात टक्केवारी सर्वात कमी असली तरी सर्वाधिक १८ हजार ८४९ मतदान झाले आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात ११ हजार ५३८, कोल्हापूर १० हजार ६०९, सांगली ५हजार ६५१ आणि सातारा जिल्ह्यात ६ हजार ३२० असे एकूण ५२ हजार ९८७ शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

प्रमुख उमेदवारांना पाचही जिह्यात मतदान त्यांच्या हक्काचा मतदार आहे; पण निर्णायक आघाडी मिळवून देण्यात व विजय सोपा करण्यात पुण्यातील मतदान महत्वाचे ठरणार आहे. गुरूवारी मतमोजणी सुरू होणार असून, त्यामध्ये कोणी कोणाच्या पारड्यात किती मते टाकली हे स्पष्ट होईल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com