Pune Half Marathon : MYFA 2020मध्ये तुमच्या हेल्थ अॅपला लोकप्रियतेची संधी ! 

Health app will get popularity at 'MYFA 2020' in Pune Half Marathon
Health app will get popularity at 'MYFA 2020' in Pune Half Marathon

पुणे : आरोग्य क्षेत्रातील वेगवेगळ्या सेवा लोकांपर्यंत पोचविण्यासाठी तुम्ही स्वतंत्र 'अॅप' विकसित केलाय नं?, लोकांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी, त्यांच्या तंदुरुस्तीची अद्ययावत माहिती सहजतेने त्यांना मिळावी, असे नवीन तंत्रज्ञान तुम्ही विकसित केले आहे का? याचे उत्तर 'हो' असणाऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे. ती आवश्‍यक वाचा. कारण, तुम्हाला तुमच्या 'अॅप'ची व्याप्ती वाढविण्याची, त्यात नामांकीत कंपन्यांच्या गुंतवणुकीची तसेच, तुमच्या प्रयत्नातून निर्माण झालेल्या नवनिर्मितीला आर्थिक बळ देण्याची संधी उपलब्ध करून देणारी ही बातमी आहे. त्याला निमित्त आहे ते 22 डिसेंबरला होणाऱ्या 'बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉन'चे! 

Pune Half Marathon : अब हर कोई बनेगा फिनिशर

'डिलिव्हरींग चेंज फाउंडेशन' (डीसीएफ) यांच्यातर्फे रविवारी (ता. 22) पहाटे 'बजाज अलायन्स पुणे हाफ मॅरेथॉन' आयोजित केली आहे. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपत्री क्रीडा संकुल येथे मॅरेथॉन आहे. 'मेक युवरसेल्फ फिट अगेन 2020' (मायफा) अशी मॅरेथॉनमागगची संकल्पना आहे. मॅरेथॉनमध्ये 'मायफा' हे आरोग्य आणि त्याच्याशी संबंधित सेवांसाठी स्वतंत्र दालन असेल. तेथे तुम्ही विकसीत केलेले नवीन 'अॅप' असो की, नवे तंत्र सहभागी धावपटूंपर्यंत पोचविता येईल. 'अॅप' उद्योजकांपुढे, गुंतवणुकदारांपुढे मांडण्याची, त्यांच्यापुढे सादरीकरण करण्याची संधी डेव्हलपर्सना मिळेल. 

आरोग्याच्या क्षेत्रात झपाट्याने होणारे बदल लक्षात घेऊन नागरिकांच्या आहार-विहारापासून ते त्यांच्या वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्या, डॉक्‍टरांच्या वेळा, त्यांना घरपोच औषध मिळवून देणाऱ्या सोयीसुविधा देणारे वेगवेगळे 'अॅप' सध्या आहेत. वेगवेगळ्या आजार आणि विकारांवर प्रतिबंधात्मक उपाय सांगणाऱ्या 'अॅप'चाही यात समावेश आहे. अशा 'अॅप'ची व्याप्ती वाढविण्याची संधी 'मायफा 2020' निमित्ताने आली आहे. बालेवाडी येथे 'अॅप' सादर करता यावे, यासाठी खास दालन खुले करण्यात येईल. 

येथे भरा तुमच्या 'इनोव्हेशन'ची माहिती 
असे व्हा सहभागी... 
1. दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
2. उघडलेल्या लिंकमध्ये आवश्‍यक ती माहिती ऑनलाईन भरा.
3. बारा डिसेंबरपूर्वी हा फॉर्म सबमीट करा. 
4. छाननी होऊन अॅपची निवड होईल. 
5. निवडलेल्या अॅपला सादरीकरणाची संधी मिळेल.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com