आरोग्य सभापतींची सावरगाव आरोग्य केंद्रास आकस्मिक भेट

दत्ता म्हसकर
गुरुवार, 24 मे 2018

जुन्नर - सावरगाव ता.जुन्नर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती प्रवीण माने यांनी मंगळवारी ता.22 रोजी सांयकाळी अचानक भेट दिली. 

सावरगाव आरोग्य केंद्र जिल्ह्यातील एक परिपूर्ण व  सुंदर आरोग्य केंद्र असल्याचा गौरवपूर्ण अभिप्राय माने यांनी यावेळी दिला. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. एम्. बी. भोर यांनी माहिती दिली. 

आढावा बैठकीच्या निमित्ताने ते जुन्नरला आले होते. त्यांच्या समवेत जिल्हा परीषद सदस्य शरद लेंडे, पांडुरंग पवार, आशा बुचके, देवराम लांडे, गुलाब पारखे, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाळे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने होते. त्यांनी आरोग्य केंद्राच्या सर्व विभागांना भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली. वैद्यकीय अधिकारी डॉ.भोर यांनी आरोग्य केंद्राच्या उपचार सुविधांची माहिती दिली. डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार, राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन, कायाकल्प अशा विविध पुरस्कारांनी आरोग्य केंद्रास गौरवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

आशा बुचके व गुलाब पारखे यांनी आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरणे, मधुमेह व उच्च रक्तदाबासाठी औषधे, इमारतीचे सुशोभीकरण व विस्तारीकरण, संपूर्ण इमारतीसाठी सौर उर्जा संच, रुग्णाच्या नातेवाईकांसाठी निवासस्थान, इत्यादी कामांसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली. सावरगांवच्या सरपंच रेणूका वारे, उपसरपंच दिपक बाळसराफ, उदय ढमढेरे व रूग्ण कल्याण समिती सदस्य उपस्थित होते. सुरेश काळे व जयश्री जाधव यांनी आभार मानले. सावरगाव ता.जुन्नर आरोग्य केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्या समवेत सभापती प्रवीण माने.

Web Title: Health Chairperson's surprise visit to Sawargaon health center