राज्यातील वीस हजार कैद्यांची आरोग्य तपासणी

yerwada
yerwada

येरवडा : राज्यातील 47 कारागृहांस नऊ मध्यवर्ती कारागृहातील तब्बल वीस हजार कैद्यांची नुकतीच आरोग्य तपासणी करण्यात आली. सर्वच धर्मादाय रुग्णांलयांकडून ही विशेष आरोग्य तपासणी मोहिम राबविण्यात आले. गेली महिनाभर दररोज कैद्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना गोळ्या -औषधे देण्यात अाल्याची माहिती कारागृहाचे उपमहानिरीक्षक तथा विशेष पोलिस महासंचालक विठ्ठल जाधव यांनी दिली.

जाधव म्हणाले, ‘‘पुण्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीराम मोडक यांनी राज्यातील कारागृहातील कैद्यांची आरोग्य तपासणी करण्याची संकल्पना मांडली होती. यावर राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी सर्व कारागृहातील कैद्यांची धर्मादाय रुग्णांलयांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबीराची रुपरेखा मांडली होती. त्यानुसार सर्व कारागृहातील कैद्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.’’

आरोग्य शिबीरात धर्मादाय रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, पॅथॉलॉजीस्ट, नेत्र व दंत चिकित्सक यांच्या मार्फत कैद्यांची तपासणी करण्यात आली. विशेषत: महिला कारागृहात महिलांची स्त्रीरोग तज्ज्ञांच्या मदतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणी केल्यानंतर कैद्यांना तत्काळ गोळ्या औषधे देण्यात आल्या. तर गंभीर आजारी असलेल्यांवर पुढील उपचार केले जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.’’

‘‘येरवडा मध्यवर्ती कारागृहात साडेपाच हजार कैदी आहेत. तर येथील रुग्णालयात फक्त चारच वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यामुळे कैद्यांच्या आरोग्य तपासणीसाठी मर्यादा येतात. त्यामुळे धर्मादाय रुग्णालयाच्या मदतीने सर्वच कैद्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.’’
- यु.टी. पवार, अधिक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह

‘‘राज्यातील कारागृहातील कैद्यांच्या आरोग्य तपासणीसाठी धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी धर्मदाय रुग्णालयांना आवाहान केले होते. त्यामुळे सर्वच रुग्णालयांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे अवघ्या कमी वेळेत सर्वच कैद्यांची आरोग्य तपासणी शक्य झाली. ’’
- नवनाथ जगताप, उपायुक्त, सहधर्मादाय आयुक्त कार्यालय, पुणे

जनहित याचिकेची घेतली दखल !
एका याचिकाकर्त्याने कारागृहातील कैद्यांची आरोग्य तपासणी होत नसल्याची जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला कैद्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आदेश दिले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com