आरोग्य समिती सचिवपदी आशा सेविका

गजेंद्र बडे
सोमवार, 9 जुलै 2018

पुणे - ग्राम आरोग्य पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या सदस्य - सचिवपदावरून अंगणवाडीसेविकांना हटविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे या समित्यांवर आता अंगणवाडीसेविकांऐवजी आशा स्वयंसेविकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या नियुक्तीनंतर अंगणवाडीसेविका या पुढे या समितीच्या केवळ सदस्य असणार आहेत. या निर्णयानुसार जिल्ह्यातील एक हजार ८६५ आशा स्वयंसेविकांची समितीच्या सदस्य-सचिवपदी नियुक्ती केली जाणार आहे. 

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील ४० हजार १२ गावांमध्ये या समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्यांच्या माध्यमातून गावांचा आरोग्यविषयक दर्जा उंचावणे, पोषणविषयक जनजागृती करणे, गावांचा परिसर स्वच्छ ठेवणे आणि पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे आदी प्रमुख कामे केली जातात. ही सर्व कामे आरोग्यविषयक बाबींशी निगडित आहेत. 

याउलट आशा स्वयंसेविका या आरोग्यविषयक जनजागृतीचेच काम करत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे जाणीवपूर्वक ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सरपंच हे या समितीचे अध्यक्ष असतात. त्यामुळे आतापर्यंत अध्यक्ष या नात्याने सरपंच आणि सदस्य-सचिव या नात्याने संबंधित गावातील अंगणवाडीसेविका यांच्या नावे संयुक्त बॅंक खाते उघडण्यात आले आहे. या पुढे हे संयुक्त खाते सरपंच आणि आशा स्वयंसेविकेच्या नावे असणार आहे.

जिल्ह्यात ४५८ गावांत अध्यक्ष निवडावा लागणार 
या समितीच्या अध्यक्षपदी सरपंचांची निवड करणे बंधनकारक असले तरी, एका सरपंचांना केवळ एकाच समितीच्या अध्यक्षपदी काम करता येते. त्यानुसार ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या गावांपैकी ग्रामपंचायत मुख्यालय असलेल्या गावच्या या समितीचा अध्यक्ष सरपंच असेल. पण याच ग्रामपंचायतीतील अन्य गावांच्या या समितीमध्ये सरपंच वगळून समितीतील अन्य एका सदस्याची निवड करण्याचा अधिकार समितीला प्रदान करण्यात आला आहे. या अधिकारानुसार पुणे जिल्ह्यातील ४५८ गावांमधील या समित्यांचे अध्यक्ष हे बिगरसरपंच असणार आहेत. 

Web Title: health committee secretary worker