पालखी सोहळ्यासाठी आरोग्य विभाग सज्ज

देहू - साठविलेल्या पाण्याची तपासणी करताना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला कर्मचारी.
देहू - साठविलेल्या पाण्याची तपासणी करताना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला कर्मचारी.

देहू - आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी २४ जून रोजी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्यासाठी देहूत येणाऱ्या लाखो भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. 

भाविकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, तसेच साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्रानेही उपाययोजना हाती घेतल्या आहेत. गावात चार ठिकाणी बाह्य रुग्ण विभाग व चार रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. 

आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव म्हणाले, ‘‘भाविकांना प्यायला शुद्ध पाणी मिळावे, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला पत्र पाठविले आहे. गावांतील २७ ठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. औषध फवारणी करण्याच्या सूचना ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी २१ कर्मचारी आणि पाच वैद्यकीय अधिकारी मिळावेत, यासाठी मागणी केली आहे. औंध येथील जिल्हा रुग्णालयाकडून चार रुग्णवाहिका, दहा शिकाऊ डॉक्‍टरांची मागणी केली आहे. वारीतील ३५० दिंड्यांना दरवर्षी आरोग्य संचाचे वाटप करण्यात येते. प्राथमिक आरोग्य केंद्रात सहा खाटा रुग्णांसाठी उपलब्ध आहेत.

पोलिसांना पत्रव्यवहार केलेला आहे. भाविकांना २४ तास आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे. मुख्य देऊळवाडा, वैकुंठस्थान मंदिर, गाथा मंदिर या ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून मुबलक औषधसाठा लवकरच उपलब्ध होणार आहे.’’

कर्मचाऱ्याची नियुक्ती
‘सोहळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या जल उपसाकेंद्राजवळ एक कर्मचारी कायमस्वरूपी नियुक्त करण्यात येणार आहे. हॉटेलचालकांना स्वच्छता राखण्याच्या सूचना केल्या असून, पाणी शुद्धीकरणासाठी मेडिक्‍लोअरच्या बाटल्या दिल्या आहेत. कीटकजन्य आजार रोखण्यासाठी गटारांची स्वच्छता सुरू आहे,’’ असेही डॉ. किशोर यादव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com