Pune News : झेडपीच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या ९६४ जागा रिक्त

मनुष्यबळाअभावी रुग्णांवर उपचार करण्याचे कर्मचाऱ्यांपुढे आव्हान
pune zp
pune zpsakal

पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आवश्‍यक कर्मचारी वर्गच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध नसल्याची बाब उघडकीस आली आहे.

सद्यःस्थितीत झेडपीच्या आरोग्य विभागातील एकूण ९६४ पदे रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर अपुऱ्या मनुष्यबळाअभावी उपचार कसे करायचे, असे आव्हान उपलब्ध कर्मचाऱ्यांपुढे आहे.

महिला आरोग्य सेविकांच्या सर्वाधिक ५८१ जागा रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या सर्वसाधारण महिती अहवालातून ही बाब उघड झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांत विविध २१ प्रकारची पदे आहेत. या सर्व पदांच्या मिळून एकूण २ हजार १६७ जागा मंजूर आहेत. त्यापैकी सध्या ९६४ जागा रिक्त असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सध्या रिक्त असलेल्या पदांमध्ये वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला) आदी प्रमुख पदांचा समावेश आहे.

पदनिहाय प्रमुख रिक्त जागा

  • तालुका आरोग्य अधिकारी - ०५

  • वैद्यकीय अधिकारी(गट अ) १४

  • आरोग्य पर्यवेक्षक ०३

  • औषध निर्माण अधिकारी २८

  • आरोग्य सेवक महिला ५८१

  • आरोग्य सेवक (पुरुष) ३१६

  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ ०४

  • आरोग्य सहायक (पुरुष) ०६.

  • अन्य (उर्वरित सर्व मिळून) ०७

  • एकूण ९६४

झेडपी आरोग्य विभागातील काही प्रमुख पदे

  • जिल्हा आरोग्य अधिकारी

  • अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी

  • जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी

  • प्रशासन अधिकारी

  • जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी

  • तालुका आरोय अधिकारी

  • वैद्यकीय अधिकारी गट अ, ब

  • औषध निर्माण अधिकारी

  • आरोग्य पर्यवेक्षक

  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ

जिल्ह्यातील आरोग्यविषयक कार्यरत यंत्रणा संक्षिप्त माहिती

  • जिल्ह्यातील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांची संख्या २८

  • प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या -१०१

  • एकूण आरोग्य उपकेंद्र -५४६

  • आयुर्वेदिक सरकारी दवाखान्यांची संख्या - १३

  • तरंगते दवाखाने -०३

  • आरोग्य पथके -११

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com