Surya Namaskar : सामूहिक सूर्यनमस्कारांनी आरोग्याचा जागर

‘सकाळ माध्यम समूहा’चा उपक्रम; तीन लाख ३९ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
health Initiative Surya Namaskar of Sakal Media Group Three lakh 39 thousand students participated
health Initiative Surya Namaskar of Sakal Media Group Three lakh 39 thousand students participatedsakal

पुणे : आजच्या धकाधकीच्या जीवनात सुदृढ आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे सामूहिक सूर्यनमस्कार या उपक्रमाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील ६०० शाळांमधील तब्बल तीन लाख ३९ हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार घालत सुदृढ आरोग्याचा जागर केला.

‘सामूहिक सूर्यनमस्कार’ उपक्रमासाठी शनिवारी सकाळी सात वाजताच विद्यार्थी शाळेच्या प्रांगणात जमले. यावेळी त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. शिक्षकांनी त्यांना पटांगणात तसेच मैदानावर शिस्तबद्ध पद्धतीने उभे केले होते. त्यानंतर मार्गदर्शकांनी केलेल्या सूचनांनुसार सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित सूर्यनमस्कार घातले. सूर्यनमस्कार घातल्यानंतर उत्साही आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवण्यास आली, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

सकाळ स्वास्थ्यम् प्रश्नमंजूषा योजना

आजच्या काळातील निरोगी आयुष्याचे महत्त्व ओळखून ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे स्वास्थ्याशी निगडित विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. यातील ‘सामूहिक सूर्यनमस्कार’ उपक्रम हा पहिला टप्पा होता. यासह भावी पिढीला आरोग्याचे महत्त्व कळावे, या उद्देशातून मुलांसाठी ‘स्वास्थ्यम्’ हे सदर सुरू करण्यात येणार आहे.

तसेच, महाराष्ट्र व गोव्यातील सर्व वयोगटातील वाचकांसाठी ‘सकाळ स्वास्थ्यम् प्रश्नमंजूषा २०२३’ ही योजना राबवण्यात येणार आहे. या प्रश्नमंजूषा स्पर्धेत आपले आरोग्य ज्ञान वाढविण्यासह आकर्षक बक्षीसे जिंकण्याची संधी वाचकांना मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com