Tanaji Sawant: घर ते ऑफिस, ऑफिस ते घर; आरोग्यमंत्र्यांच्या दौऱ्याची उडतेय खिल्ली!

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत.
Tanaji Sawant
Tanaji SawantSakal

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या दौऱ्याचं वेळापत्रक समोर आलं आहे. आणि यामुळेच सध्या त्यांची खिल्ली उडवली जात आहे. तानाजी सावंत तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यावरुन आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

तीन दिवसांच्या या पुणे दौऱ्यात मंत्री तानाजी सावंत हे पुण्यातल्या कात्रजमधल्या त्यांच्या घरून निघून कात्रजमधल्या बालाजी नगरमधल्या त्यांच्या कंपनीच्या कार्यालयात जाणार आहेत. तिथून पुन्हा ते घरी...एवढाच काय तो प्रवास या दौऱ्याच्या वेळापत्रकात दाखवण्यात आला आहे. सावंतांच्या घरापासून ऑफिस अवघ्या पाच ते दहा मिनिटांच्या अंतरावर आहे.

तिन्ही दिवसांचा कार्यक्रम हा केवळ घर ते ऑफिस, ऑफिस ते घर असल्याने त्यांची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुकवरुन त्यांच्या दौऱ्याचा फोटोही शेअर केला आहे. हा किती कामाचा दौरा आहे पहा. महाराष्ट्राचं वाटोळं करणारे हेच अडाणी लोक घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर. अशी टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, जोरदार टीकेचा सामना करावा लागल्यानंतर सावंतांच्या दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. नवीन वेळापत्रक पुन्हा एकदा प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com