कोरोना रुग्णाच्या प्रत्येक बिलाचे ऑडिट होणार; आरोग्यमंत्री टोपे यांच्या सक्त सूचना

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 September 2020

पुण्यात साडेचार हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे डेथ ऑडिट कमिटीची कार्यवाही गतीने झाली पाहिजे. रुग्णाचा मृत्यू कशामुळे झाला, याची कारणमीमांसा झाली पाहिजे.

पुणे : कोरोना बाधित रुग्णांवरील उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात येणाऱ्या प्रत्येक बिलाचे प्री ऑडिट झालेच पाहिजे. ऑडिटरची सही झाल्याशिवाय पुढील कार्यवाही करण्यात येऊ नये. कोणत्याही परिस्थितीत नातेवाईकांना रुग्णांवरील उपचाराबाबत दररोज विस्तृत माहिती देण्यात यावी, अशा सक्‍त सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

Breaking : रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय; १२ सप्टेंबरपासून धावणार विशेष रेल्वेगाड्या!​

पुण्यात साडेचार हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे डेथ ऑडिट कमिटीची कार्यवाही गतीने झाली पाहिजे. रुग्णाचा मृत्यू कशामुळे झाला, याची कारणमीमांसा झाली पाहिजे. मुंबई-पुण्यासह अन्य शहरांत 30 टक्‍के मृत्यू हे रुग्णालयात दाखल केल्यानंतर 24 तासांत झाले आहेत. बऱ्याचदा रुग्ण शेवटच्या क्षणी दाखल झाल्यामुळे डॉक्‍टरांनाही रुग्णाला वाचवणे अवघड जाते. त्याबाबत आवश्‍यक खबरदारी घेण्याची गरज आहे. 

पत्रकारांच्या विमा संरक्षणाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी दिले संकेत; अधिवेशनात मांडणार मुद्दा​

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या दोन हजार पदव्युत्तर विद्यार्थ्यांची परीक्षा संपताच त्यांची कोविड रुग्णालयात नेमणुका करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकार आणि आरोग्य विभागाच्या वतीने भरती प्रक्रियेतून डॉक्‍टरांच्या रिक्‍त जागा भरण्यात येतील. ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे राज्यातील प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये एक्‍स रे मशिन उपलब्ध करून देण्यात येतील. छातीचा एक्‍स रे काढून पुण्यातील कॉल सेंटरमधील रेडिओलॉजिस्टकडे पाठविण्यात येईल. त्यामुळे वेळेत निदान होऊन रुग्णाला उपचार मिळाल्यास मृत्यूदर कमी होईल. 

'वर्क फ्रॉम होम'चा आयटीयन्सच्या परफॉर्मन्सवर 'असाही' होतोय परिणाम!​

महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत कॅशलेस सेवा देण्यात येत आहे. नागरिकांकडून पैसे घेण्यात येऊ नये. कोणी जादा पैसे घेतल्यास पाचपट दंड आकारण्यात येईल. तसेच, या योजनेतील यादीतून वगळण्यात येईल. कोणतेही रेशन कार्ड असले तरी राज्यातील सर्व नागरिकांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. 

कॉन्टक्‍ट ट्रेसिंग पाचव्या दिवशी चाचणी 
एखाद्या बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्‍तीने पाचव्या दिवशी चाचणी करून घ्यावी. त्यामुळे अचूक निदान करणे शक्‍य होते, असे त्यांनी नमूद केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health Minister Rajesh Tope said every bill on corona patients will be audited