सरकार लक्ष देणार का... नाकाबंदीवरील कोरोना योद्ध्यांपुढे आहेत या समस्या...

दत्ता म्हसकर
मंगळवार, 30 जून 2020

चेकपोस्टवर संबंधित कर्मचाऱ्यांसाठी पुरेशा सुविधा नाहीत. तसेच, त्यांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शनही केलेले नाही. त्यामुळे

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यातील खुबी- माळशेज घाट येथे नाकाबंदीवर कार्यरत असलेल्या ओतूरच्या तरुण पोलिस अधिकाऱ्यास कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर, काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या चेक पोस्टवर कार्यरत असणाऱ्या एका शिक्षकास कोरोनाची बाधा झाली होती. तसेच, या चेकपोस्टवर संबंधित कर्मचाऱ्यांसाठी पुरेशा सुविधा नाहीत. तसेच, त्यांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शनही केलेले नाही. त्यामुळे नाकाबंदीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती आणि नियोजनबद्ध धावपळ; वाचा तुम्हाला माहिती नसलेल्या सुप्रिया सुळे

लॉकडॉउनच्या काळात मार्च महिन्यात ओतूर पोलिसांनी अणे- माळशेज घाटात नाकाबंदी सुरू केली होती. ३० मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण डिंगोरे येथे मार्चमध्ये मिळून आला होता. कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात होऊ नये, यासाठी तालुक्याची नाकाबंदी करण्यात आली होती. बारा ठिकाणी तपासणी नाके करण्यात आले. येथे शिक्षक, वनविभाग, महसूल व एसटीचे कर्मचारी नियुक्त केले होते. या बारापैकी सध्या जिल्हा बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी खुबी- माळशेज घाट आळेखिंड, शिंदेवाडी, मांजरवाडी व वारूळवाडी या पाच ठिकाणी चेकपोस्ट कार्यरत आहेत. 

HappyBirthday:म्हणून, सुप्रिया सुळे बनल्या संसदरत्न

बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तीची माहिती तातडीने मिळावी हा यामागे उद्देश होता. त्यात प्रामुख्याने मुंबईहून येणाऱ्या प्रवासी वाहनांची नोंद आणि प्रवाशांची आरोग्य तपासणी यासाठी महसूल व जिल्हा परिषदेच्या वतीने एप्रिल महिन्यात माळशेज घाटात चेकपोस्ट सुरू करण्यात आले होते. 

पुणे : लग्न समारंभांना होतीये गर्दी; शासनाच्या निर्णयाला केराची टोपली...

येथील कर्मचाऱ्याना स्वयंसेवी संस्थांच्या मदतीतून मंडप, ताडपत्री, सॅनिटायझर, मास्क, थर्मामिटर आदी सुविधा देण्यात आल्या होत्या. मोबाईल रेंजअभावी घाटातील चेकपोस्ट मढ- पारगाव येथे आणले गेले. चेकपोस्टवर काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाने नेमकी कोणती काळजी घ्यावी, याबाबत त्यांना पुरेसे मार्गदर्शन करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. ऊन, वारा व पाऊस यापासून संरक्षण कसे करावे, या चिंतेत हे कर्मचारी आपले काम करताना दिसत आहेत. काहींना किरकोळ आजारास सामोरे जावे लागले आहे. पुरेसा निवारा नसल्याने ऐन पावसाळ्यात काम कसे करावे, हा त्यांच्या पुढे खरा प्रश्न आहे. त्यांना तंबू देण्यासाठी निधीची मागणी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले असले, तरी निधी मात्र अद्याप पोचला नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

चेकपोस्ट फक्त नावाला
या चेकपोस्टचा उद्देश कितपत सफल आला, हा संशोधनाचा विषय होईल. मात्र, दोन चेकपोस्ट असूनही  मुंबईतील हजारो लोक जुन्नर तालुक्यातील गावोगावी दररोरोज पोचत होते. तालुक्यात मिळून आलेल्या कोरोना रुग्णात मुंबईच्या रुग्णाची संख्या अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजीपाला ने आण करणाऱ्या वाहनातून व खासगी वाहनातून राजरोसपणे लोक येत असल्याचे निष्पन्न झाले होते. यात आर्थिक देवाण घेवाण होत असल्याची चर्चा आहे.
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health problems to the employees at the check post in Junnar taluka