आंबेगावात आरोग्यसेवाच आजारी 

doctor.
doctor.

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्‍यात उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. आरोग्यसेवा कागदोपत्री मोठी असली तरी प्रत्यक्षात ती आजारी पडली आहे. 

उपजिल्हा रुग्णालयासह अनेक डॉक्‍टरांची पदे रिक्त आहेत. अवसरी खुर्द, तिरपाड, शिंगवे, लांडेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारती उभ्या आहेत. पण डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या न झाल्याने येथील रुग्ण आरोग्यसेवेपासून वंचित आहेत. औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांना पैसे मोजून औषधे विकत घ्यावी लागतात. 

तिरपाड, अवसरी खुर्द व शिंगवे आरोग्य केंद्राची इमारत वापराविना पडून आहे. "लांडेवाडी येथे तीन वर्षापूर्वी तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते आरोग्य केंद्राचे उद्‌घाटन झाले. पण सर्वच पदे रिक्त आहेत. आठवड्यातून एक, दोन दिवस अन्य आरोग्य केंद्राचे डॉक्‍टर येथे येऊन थांबतात. पण येथे वीज, पाणी व फ्रिजची सोय नाही. इंजेक्‍शन उपलब्ध होत नाहीत. रुग्णांना अन्य ठिकाणी जावे लागते,' असे ग्रामस्थ खंडेराव आढळराव पाटील यांनी सांगितले. आरोग्य केंद्रासाठी एकूण 56 पदे रिक्त आहेत, अशी माहिती आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 
 
सर्वच आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी अनेक समस्या डोके वर काढत आहेत. सामान्य रुग्णांना नाइलाजास्तव खासगी हॉस्पिटलमध्ये धाव घ्यावी लागते. औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याने रुग्णांना औषधासाठी पैसे मोजावे लागतात. आरोग्य यंत्रणेवरच प्रथम प्राथमिक उपचार होणे गरजेचे आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन आरोग्यसेवेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. 
- उषा रमेश कानडे, सभापती 

 
विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नामुळे उपजिल्हा रुग्णालयात लोकसहभागातून दोन वर्षापासून डायलिसिस विभाग सुरू झाला आहे. पण तंत्रज्ञाची अजून नियुक्ती झाली नाही. येथे दर महिन्याला 168 वेळा रुग्णावर उपचार होत आहेत. नेमलेल्या खासगी तंत्रज्ञाचा पगार मोरडे फुड्‌स कंपनीमार्फत केला जातो. रेडिओलॉजिस्ट, एक्‍स रे तंत्रज्ञ व दंतरोग तज्ज्ज्ञ ही पदे रिक्त आहेत. 
- जगदीश घिसे, सदस्य, रुग्णकल्याण समिती, उपजिल्हा रुग्णालय मंचर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com