आरोग्यसेवा खासगीकरणाचा ठराव दिला नाही - चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

पुणे - ‘‘महापालिकेच्या आरोग्य विभागात ५१८ पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांची १०० पदे भरलेली नाहीत. जाहिरात देऊनही तज्ज्ञ डॉक्‍टर मिळत नाही. मग, महापालिका नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा कशी देणार ?’’, असा सवाल नगरसेविका श्‍वेता श्रीशेठ चव्हाण यांनी केला आहे. दरम्यान, सर्व आरोग्यसेवांचे खासगीकरण करावे, असा कोणताही ठराव आपण दिला नसल्याचा खुलासा चव्हाण यांनी केला आहे. 

येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयातील विनावापर असणाऱ्या जागेवर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची सुविधा आउटसोर्सिंग पद्धतीने पुणे महापालिका आणि खासगी वैद्यकीय संस्थेमार्फत चालविण्यास द्यावी, असा ठराव चव्हाण आणि नगरसेवक अविनाश साळवे यांनी महिला व बालकल्याण विभागास दिला आहे. याबाबत चव्हाण म्हणाल्या, ‘‘अपुरे कर्मचारी आणि डॉक्‍टर, निधीचा अभाव, तज्ज्ञांची कमतरता यामुळे महापालिका दवाखान्यांमध्ये नागरिकांना चांगली आरोग्यसेवा मिळत नाही.  अशा वेळी महापालिकेच्या पडून असणाऱ्या जागांचा वापर करून ‘पीपीपी’ तत्त्वावर आरोग्य सेवा देण्याचा विचार महापालिकेस करावा लागेल. एक तर तत्काळ आरोग्यसेवा सुधाराव्यात वा विनावापर जागेचा गैरवापर टाळून या जागा इतर संस्थांना देऊन शासकीय दराने त्यांच्याकडून सेवा उपलब्ध करून घ्याव्यात एवढेच आपले म्हणणे आहे. आपण खासगीकरणास प्रोत्साहन दिलेले नाही.’’

Web Title: Healthcare has not a resolution of privatization