सुदृढ आरोग्यासाठी योगशिक्षिका शिराढोणकर यांचा पुढाकार

Yoga
Yoga

पुणे - आजचे युग संगणक युग आहे. मोबाईल, फेसबुक आणि इतर साधनांमुळे जग जवळ आले आहे, असे वाटत आहे. मात्र, तो वरवरचा भास आहे. आज माणसाला समोर आल्यावर संवाद साधता येत नाही. या सर्व आधुनिक साधनांमुळे माणूस आतून एकटा पडला आहे. आपले मानसिक आरोग्य तसेच शारीरिक आरोग्य, हरवून बसला आहे, अशा परिस्थितीत माणसाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले रहावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन योगशिक्षिका युगंधरा शिराढोणकर (उदगीरकर) यांनी 5-6 महिन्यांपासून सोसायटीतील लोकांना विनामूल्य योग शिकवायला सुरवात केली. सर्व विद्यार्थ्यांना खूप छान वाटत आहे. म्हणून त्यांनी आज आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे निमित्त साधून त्यांच्या विद्यार्थ्यांकडून 'तू बुध्दी दे' या गाण्यावर योगा करून घेतला. 

सर्वप्रथम जमलेले विद्यार्थी आणि नागरिक यांच्याकडून पूरक व्यायाम, काही आसने, प्राणायाम करून घेतले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी योगकला सादर केली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून योगशिक्षिका मंजूषा चौधरी आणि संगीतशिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सुहासिनी सुरेश उपस्थित होत्या. सुरेश म्हणाल्या, जसे आपण जेवण रोज करतो तसेच योगा, प्राणायाम आणि साधना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग व्हायला हवा. नवीन पिढीला हे संस्कार द्यायला हवे म्हणजे येणारी पिढी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ होईल आणि देशाची प्रगती होईल. यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे. 

योगाचे सुंदर सादरीकरण ज्या विद्यार्थ्यांनी सादर केले. या सर्वांचे कौतुक शिवनगरी सोसायटीच्या नागरिकांनी केले. हे सादरीकरण मुग्धा पडतुरे, सायली पाडगावकर, अर्चना धांडे, हेमा पडतुरे, नलिनी लोखंडे, शीतल देशमुख, दीपाली लोखंडे या विद्यार्थिनींनी केले. 

ज्येष्ठ नागरिक कापडे, डांगे, शुभांगी कुलकर्णी, रमा, शिराढोणकर, काळे आदींनी उपस्थित राहून योगा केला. तरूण षुरूष मंडळीही उपस्थित होते. त्यात ऊपेंद्र, देशमुख आणि इतर मंडळी उपस्थित होते. 

सर्व विद्यार्थ्यांनी आम्हाला युगंधरासारखी शिक्षिका मिळाली हे आमचे भाग्य आहे, असे सांगितले. 

युगंधराने सांगितले, की तिला तिच्या आईकडून ही प्रेरणा मिळाली. त्या म्हणाल्या, की मी लहान असताना आईला योगा करताना पाहत होते. आईही सामाजिक उपक्रम म्हणून विनामूल्य योगा शिकवत असे. आता तिच्या पावलांवर पाऊल टाकायचा माझा छोटासा प्रयत्न आहे. माझ्या आईने खूप समाजकार्य केले. तिच आमची प्रेरणा आहे. 

हा सर्व कार्यक्रम 21 जूनला सकाळी शिवनगरीतील कम्युनिटी सेंटरच्या मोकळ्या जागेत कोथरूड भागात पार पडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com