डीएसके व कुटुंबियांच्या जामीनावर आज निकाल

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

सोमवारी (ता.25) सत्र न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात जामिनावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. डीएसके यांनी 184 कोटी रुपये आपल्या नातेवाइकांच्या खात्यावर वळविले.

पुणे : ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके), हेमंती कुलकर्णी आणि सई वांजपे यांच्या जामिनावर तर तन्वी कुलकर्णी, स्वरूपा कुलकर्णी, अश्विनी देशपांडे यांच्या अटकपूर्व जामिनावर आज निकाल होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा सकाळचे एप

सोमवारी (ता.25) सत्र न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात जामिनावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. डीएसके यांनी 184 कोटी रुपये आपल्या नातेवाइकांच्या खात्यावर वळविले. प्रकल्पासाठी बॅंकेकडून कर्ज घेऊन ते पैसे इतरत्र वळविण्यात आले. डीएसके यांनी आर्थिक नियोजन न करता आल्याने त्यांच्यावर कर्ज झाल्याच्या युक्तिवाद विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी केला.

डीएसके यांच्यातर्फे ऍड. श्रीकांत शिवदे यांनी जामिनावर युक्तिवाद केला. डीएसके यांच्या सर्व कंपनी अधिकृत आणि नोंदणीकृत असून त्यांनी वेळोवेळी कर भरलेला आहे. त्यामुळे सरकारी वकिलांनी संबंधित कंपन्या या काल्पनिक असल्याचा व नोंदणीकृत नसल्याचा केलेला दावा चुकीचा आहे. कंपनीचा आत्तापर्यंतचे कामकाज डीएसके यांचे वय व त्यांना असलेले आजार या सर्वांचा विचार करता त्यांना जामीन देण्यात यावा अशी मागणी, ऍड. शिवदे यांनी केली आहे.

आणखी वाचा - पुन्हा निर्भया; हैदराबादमध्ये सामूहिक बलात्कार करून तरुणीला जाळले

आणखी वाचा - काय घडलंय गोव्यात, संजय राऊत यांचे संकेत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hearing on bail application of d s kulkarni family