‘डीपी’वरील हरकतींवर १६ पासून सुनावणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

पुणे - राज्यसरकारकडून पुणे महापालिकेच्या मूळ हद्दीच्या प्रारूप विकास आराखड्याला (डीपी) मंजुरी दिली. परंतु त्यातून वगळण्यात आलेल्या क्षेत्रांमधील नियोजित फेरबदलांवर १६ एप्रिलपासून २ हजार २७० हरकती व सूचना आल्या असून त्यावरील सुनावणी १६ ते २० मे दरम्यान होणार आहेत. सहकारनगरच्या बागूल उद्यानामध्ये ही सुनावणी होईल, अशी माहिती नगररचना विभागाचे सहसंचालक अविनाश पाटील यांनी दिली.

राजपत्रानुसार, पुणे महापालिकेच्या मूळ हद्दीच्या विकास आराखड्यामधून ई.पी. १ ते १७६ आणि ई.पी.आर. १ ते ६३ यांचे नकाशे महापालिका आणि नगररचना विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले असून त्यावर नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार नगररचना कार्यालयाकडे २ हजार २७० हरकती व सूचना, २७३ अन्य विषयांवरील अर्ज दाखल झाले आहेत. त्यावर नगररचना संचालनालयाकडून १६ ते २० मे दरम्यान सहकार नगर येथील पंडित भीमसेन जोशी कलादालन आणि बागूल उद्यानामध्ये सुनावणी होईल. त्यानंतर अहवाल राज्यसरकारकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती सहसंचालक पाटील यांनी दिली.

Web Title: Hearing on objections from DP on 16th