Untitled-5.gif
Untitled-5.gif

पुणे : चंदननगर येथील डॉ. आंबेडकर वसाहतीत भीषण आग  

रामवाडी : चंदननगर येथील सुंदरबाई शाळेशेजारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागून भंगारचे दुकान व घरवजा भाजीपाला असलेले दुकान आगीत भस्मसात झाले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी अग्नीशमन दलाकडून आग विझवण्यात आली आहे.  

दरम्यान, कौशल्या बाळासाहेब कामठे या चाळीस वर्षांपासून त्या वस्तीमध्ये राहतात. त्यांचे येथे पत्र्याचे घरवजा भाजीपाल्याचे दुकान आहे. उदरनिर्वाहसाठी भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. एकटी असल्याने रोज रात्री मुंढवा येथे बहिणीच्या मुलाकडे रात्री वस्तीला राहतात. घराला आग लागल्याची वार्ता फोनवरून पहाटे कळाली. त्यांचा सर्व संसार आगीत भस्मसात झाला होता. त्यांच्या या घरांमध्ये काल रात्री सविता घोडके यांनी वीस हजार रुपयांच्या बांगड्यांचा माल याठिकाणी ठेवला होता. तो ही त्या आगीत खाक झाला असे कामठे यांनी सांगितले.

मुक्ता कुदळे यांच्या दोन्ही पाण्याच्या टाक्यांना आगीची झळ बसली आहे. या वस्तीत जवळपास 580 घरे आहेत. आठ बाय आठची घरे, वस्तीतले गरीब लोकांना गॅस व वीज बिल परवडत नसल्याने एकमेव साधन म्हणजे चुल, ती घराच्या पुढे मांडली गेली आहे. पहाटे अंघोळीचे पाणी गरम करण्यापासून ते स्वयंपाक चुलीवर केला जातो. विजेचे लाकडी खांबावर लोंबकळणाऱ्या विद्युत वायर, रस्त्याच्या कडेला उभारलेल्या दुचाकी गाड्या, हातगाड्या साहित्याने भरलेली पोती, पडलेला कचरा सिमेंटच्या मोठ्या पाईप, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. दरम्यान, येथे एकमेव रस्ता असल्याने जाणाऱ्या-येणाऱ्यांची वर्दळ सुरू असते. भविष्यात एखादी आगीची घटना घडू नये यासाठी प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात योग्य ती कारवाई करावी अशी मागणी वसाहतीतील नागरिकांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com