अतिवृष्टीची बंधाऱ्यांना झळ; पुणे जिल्ह्यातील 210 बंधाऱ्यांचे नुकसान

गजेंद्र बडे
बुधवार, 4 डिसेंबर 2019

- दुरुस्तीसाठी 33 कोटींची गरज        

पुणे : पुणे जिल्ह्यातील बंधाऱ्यांना चालू वर्षातील पावसाळ्यातील अखेरच्या टप्प्यात झालेल्या अतिवृष्टीची मोठी झळ बसली आहे. यामुळे जिल्ह्यातील 210 बंधाऱ्यांचे नुकसान झाले आहे. या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी तब्बल 33 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. दरम्यान, याचा जिल्ह्यातील बंधाऱ्यांच्या नव्या कामांना फटका बसण्याचा धोका निर्माण झाला आहे. नुकसान झालेल्यांमध्ये कोल्हापूरी बंधारे, वळण बंधारे, साठवण बंधारे आणि गाव तलावांचाही समावेश आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप          

जिल्हा परिषदेच्या छोटे पाटबंधारे विभागाने जलसंधारणाच्या कामांचा आगामी आर्थिक वर्षाचा (२०२०-२१) आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. आगामी वर्षात बंधाऱ्यांची नवीन ११० कामे निश्चित करण्यात आलेली आहेत.

बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि नव्या कामांसाठी सुमारे ७७ कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याचेही या आराखड्यात नमूद केले आहे. याला पुणे जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rain affected to Bandhara