raine
rainesakal

मंचरला सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची जोरदार बॅटिंग

पुणे नाशिक रस्त्यावरून पाणी वाहत होते.

मंचर : मंचर शहर व परिसरात संध्याकाळी जोरदार पाऊस झाला. मंचर एसटी बस स्थानकाला अक्षरशः तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. असलेल्या बाणखेले कॉम्प्लेक्स व अन्य चार इमारतीत च्या दुकानांमध्ये पाणी शिरले.गणेश मंडळाचे कार्यकर्ते आरतीच्या तयारीत असतानाच मुसळधार पाऊस झाल्याने कार्यकर्त्यांची तसेच विविध विक्रेत्याने उभारलेल्या स्टॉल मालकांची अक्षरशा धांदल उडाली.

बुधवार प्रमाणेच गुरुवारीही पावसाने जोरदार बॅटिंग केली. पुणे नाशिक रस्त्यावरून पाणी वाहत होते. फळे फुले व पूजेचे साहित्य विकणारे यांनापावसाचा फटका बसला. एसटीतून प्रवास करण्यासाठी बस स्थानकावर आलेल्या प्रवाशांना एक ते दीड फूट पाण्यातून प्रवास करण्याच्या प्रसंगाला सामोरे जावे लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com