Vidhan Sabha 2019 : पुणेकरांनो उद्या मुसळधार पावसाचा अंदाज; जाणून घ्या मतदानाला कधी बाहेर पडावे

Heavy rain forecast for tomorrow in pune
Heavy rain forecast for tomorrow in pune

विधानसभा 2019

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात धुमाकूळ घालणारा पाऊस उद्या (सोमवार, 21 ऑक्टोबर) मतदानादिवशीही हजेरी लावणार आहे. त्यामुळं उद्याच्या पावसाचा अंदाज घेऊनच मतदारांना बाहेर पडावं लागणार आहे. 

राज्यासह पुण्यात विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी (ता. २१) दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे मतदारांनो तुम्ही दुपारी बारावाजेपर्यंत मतदान करा. 

राज्यात शनिवारपासून सर्वत्र पाऊस सुरू आहे. रविवारी सुटीच्या दिवशीही पावसाने राज्याच्या विविध भागात हजेरी लावली. पावसाचा जोर उत्साही कायम रहाणार आहे. विशेषत: दुपारनंतर तो जोर वाढेल, असेही खात्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुणेकरांनी दुपारी 12पर्यंतच मतदानाचा हक्का बजावून घ्यावा, अशी परिस्थिती आहे.

हवामान खात्याने पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यात प्रमुख्याने नगर, सोलापूर, पुणे, सातार, कोल्हापूर, सांगली येथे मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. परिणामी या जिल्ह्यांत मतदानाच्या टक्केवारीवर पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com