esakal | Live: पुण्यात काय आहे पावसाची स्थिती? कुठे, कशी आहे परिस्थिती?
sakal

बोलून बातमी शोधा

Live: पुण्यात काय आहे पावसाची स्थिती? कुठे, कशी आहे परिस्थिती?

Live: पुण्यात काय आहे पावसाची स्थिती? कुठे, कशी आहे परिस्थिती?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

येत्या दोन-तीन तासांत पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यावेळी जोरदार ढगांचा गडगडाट तसेच मुसळधार पाऊस होणार आहे. सध्या सर्व पुणेकरांनी घरीच रहा, असा सावधगिरीचा इशारा देखील विभागाकडून देण्यात आला आहेत. या मुसळधार पावसात झाडे कोसळण्याची, जोरदार वारा वाहण्याची शक्यता आहे.

 • सिंहगड रस्ता : पावसामुळे पानमळा, पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, दत्तवाडी या परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता.

 • संपूर्ण नगर रस्ता परिसरात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तासभर मुसळधार पाऊस कोसळला. नगर रस्त्यावर विमाननगर चौक, पाचवा मैल चौक, खराडी दर्गा परिसर येथे रस्त्यावर पाणी साचले होते

 • विश्रांतवाडी परिसरात सातनंतर मुसळधार पाऊस पडत आहे. फुलेनगर, अग्रसेन शाळेजवळ तसेच विमानतळ रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले आहे. टिंगरेनगरमध्ये पहाटेपासून वीज नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

 • बिबवेवाडी परिसरातील रस्ते जलमय झाले असून महेश सोसायटी ते भारत ज्योती पर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आले असून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.

 • सातारा रस्त्यावरील आंबील ओढ्या लगतच्या गुरुराज सोसायटीच्या नागरिकांच्या मनात धडकी, विजेचा कडकडाट मुसळधार पाऊस 25 सप्टेंबरची आठवण येत असल्याचे देविका थोरात यांनी सांगितले.

 • वडगाव शेरीत आनंद पार्क जवळ राजेंद्रीनगर काॅर्नरला मोठ्या प्रमाणावर पाणी साठलंय. चंदननगर पोलिस स्टेशन बाहेर देखील पाणी साठलंय.

अत्यंत महत्त्वाचे ! पुणे आणि लगतच्या भागांवर सध्या १२ ते १५ किमी उंचीचे ढग आहेत. काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होऊन वाहतूक खोळंबणे, सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरणे, फ्लॅश फ्लडसारख्या घटना होऊ शकतात. पाऊस थांबेपर्यंत घरातच थांबा. - पुणे महापौर मुरलीधर मोहोळ

 • रामटेकडी, वैदूवाडी परिसरात विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडत आहे.

 • वाघोलीत दीड तासापासून जोरदार पाऊस.

 • सखल भागात पाणी साचले

 • पुणे नगर महामार्गावरील वाहतूक मंदावली. यामुळे काही प्रमाणात कोंडी

 • अचानक पाऊस सुरू झाल्याने नागरिकांचे हाल.

 • अद्यापही जोरदार पाऊस सुरू

 • पाऊस सुरू झाल्यापासून वीज पुरवठा गुल.

 • विश्रांतवाडी परिसरात सातनंतर मुसळधार पाऊस पडत आहे. फुलेनगर, अग्रसेन शाळेजवळ तसेच विमानतळ रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले आहे. टिंगरेनगरमध्ये पहाटेपासून वीज नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

 • भोसरी परिसरात पावसाचा जोर आता ओसरला आहे. (वेळ संध्या. 08:13)

 • औंध व परिसरात जोरदार पाऊस

 • तासभरापासून औंध,बोपोडी, सकाळ नगर, पंचवटी,पाषाण,सुतारवाडी,महाळुंगे,सूस परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे.

 • शिवाजीनगर गावठाणात जोराचा पाऊस सुरू असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे.

 • खडकी, वाकडेवाडी परिसरात ढगाच्या गडगडाटासह विजाच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु, लाईट गेल्याने सर्वत्र अंधार

loading image
go to top