Karve-Raod
Karve-Raod

Pune Rain : मुसळधार पावसामुळे कर्वे रस्त्याला नदीचे स्वरूप

कोथरूड : कोथरूड भागातील मुख्य कर्वे रस्ता परिसरात बुधवारी (ता.9) आलेल्या मुसळधार पावसामुळे महर्षी कर्वे पुतळा चौकात रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कोथरूडमध्ये ढगफुटीसारख्या मुसळधार पावसास सुरुवात झाली. आणि अवघ्या पंधरा मिनिटांतच कर्वे रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले. कर्वे रस्त्यावरील महर्षी कर्वे पुतळा चौक, पौड फाटा ते नळस्टॉप चौक या भागामध्ये रस्त्यावरुन पावसाच्या पाण्याचा जोरदार प्रवाह सुरु असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. 

‎एक तासाच्या मुसळधार पावसानंतर पावसाने थोडी विश्रांती घेतली. यावेळी रस्त्यालगत लावण्यात आलेल्या दुचाकी गाड्या पावसाच्या पाण्यामध्ये अर्ध्या बुडाल्या होत्या. रस्त्याजवळील पदपथावर देखील पावसाचे पाणी वाहत होते.

पुन्हा एकदा पालिकेवर नामुष्की येणार 

‎बुधवारी सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसामुळे कोथरूडकरांना 2010 मधील पावसाची आठवण झाली. त्यावेळी महापालिकेतर्फे कर्वे रस्त्यावरून पाणी वाहत असल्यास वाहतूक करु नये, असे फलक लावण्यात आले होते. या पावसामुळे पुन्हा एकदा असे फलक लावण्याची वेळ पालिकेवर येणार आहे.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com