खडकवासलाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार, मुठा नदीत विसर्ग सुरू; सतर्कतेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

खडकवासला प्रकल्पाच्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे प्रकल्पाच्या उपयुक्‍त पाणीसाठ्यात सुुमारे अर्धा अब्ज घनफुटाने (टीएमसी) वाढ झाली आहे. खडकवासला धरणातून गुरुवारी सकाळपासून तीन हजार 420 क्‍युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाकडून नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे - खडकवासला प्रकल्पाच्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे प्रकल्पाच्या उपयुक्‍त पाणीसाठ्यात सुुमारे अर्धा अब्ज घनफुटाने (टीएमसी) वाढ झाली आहे. खडकवासला धरणातून गुरुवारी सकाळपासून तीन हजार 420 क्‍युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाकडून नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खडकवासला प्रकल्पातील चार धरणांतील उपयुक्‍त पाणीसाठा 29.11 टीएमसी (99.60 टक्‍के) झाला आहे. गतवर्षी या प्रकल्पात 28.15 टीएमसी (96.56 टक्‍के) इतका पाणीसाठा होता. खडकवासला, पानशेत आणि वरसगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. टेमघर धरणही जवळपास पूर्ण भरले आहे. पानशेत धरणातूनही एक हजार 950 क्‍युसेकने विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली.

पुणे ‘स्मार्ट सिटी'ची कामे कागदावरच ‘स्मार्ट’ 

खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्रभरात सर्वाधिक 137 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पानशेत 97 मिमी, वरसगाव 94 मिमी आणि टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 113 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

जिल्ह्यात बुधवारी झालेल्या पावसामुळे भीमा खोऱ्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. एकूण 26 धरणांपैकी 20 धरणांमध्ये शंभर टक्‍के पाणीसाठा झाला आहे. उर्वरित पिंपळगाव जोग आणि माणिकडोह धरणात सुमारे 50 टक्‍के तर अन्य चार धरणांमध्ये सुमारे 90 ते 95 टक्‍के पाणीसाठा झाला आहे. उजनी धरणातून भीमा नदीमध्ये एक लाख 86 हजार क्‍युसेकने तर वीर धरणातून नीरा नदीमध्ये 45 हजार 771 क्‍युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 

पुणे आरटीओने दुचाकी, चारचाकी परवान्यासाठीच्या मुदतीत केली वाढ

धरणातील उपयुक्‍त पाणीसाठा टीएमसीमध्ये (कंसात टक्‍केवारी) -
खडकवासला 1.97 (100) 
पानशेत 10.65 (100 ) 
वरसगाव 12.82 (100) 
टेमघर 3.67 (99.09) 

Pune Rain Updates : सहकारनगर, धनकवडीत पावसाचा हाहाकार; 227 मिलीमीटर पावसाची नोंद  

अन्य काही धरणांतील पाणीसाठा टीएमसीमध्ये (कंसात टक्‍केवारी) -
पवना 8.34 (98.02) 
भामा आसखेड 7.67 (100) 
मुळशी 17.46 (94.60) 
ेकळमोडी 1.51 (100) 
चासकमान 7.57 (100) 
आंद्रा 2.92 (100) 
गुंजवणी 3.69 (100) 
भाटघर 23.51 (100) 
नीरा देवघर 11.73 (100) 
वीर 9.41 (100) 
नाझरे 0.59 (100) 
डिंभे 12.49 (99.96) 
उजनी 53.57 (100) 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rain in Khadakwasla catchment area