Pune Rain : पंधरा मिनिटांच्या पावसामुळे व्हीआयपी रस्ता गेला पाण्यात!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

खडकी कॅन्टोन्मेंट आणि पुणे महापालिका यांच्या हद्दीच्या वादामुळे येथील रहिवाशांना याचा त्रास भोगावा लागत आहे.

खडकी बाजार : खडकी, वाकडेवाडी, मुळारोड परिसरात बुधवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पंधरा मिनिटे मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे मुळारोड सर्कल भोवती मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने सर्कलला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.

पुढे काही अंतरावरही वॉर सिमेंट्री समोर ही नेहमी प्रमाणे संपूर्ण रस्त्यावर पाणी जमा झाल्यामुळे येथे वाहतुककोंडी झाली होती. मुळारोड येथील ही कायमस्वरूपी समस्येवर तोडगा काढावा, अशी प्रतिक्रिया मुळारोड येथील रहिवाशांनी व्यक्त केली.

- रणबीर कपूरची गर्लफ्रेंड दिसणार हॉलीवूड चित्रपटात?

व्हीआयपी समजला जाणारा मार्गावरील मुळारोड सर्कल व वॉर सिमेंट्री या दोन ठिकाणांवर थोडा जरी पाऊस पडला तरी मोठ्या प्रमाणात पाणी जमा होऊन येथे वाहतूककोंडी होते. ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून आहे. खडकी कॅन्टोन्मेंट आणि पुणे महापालिका यांच्या हद्दीच्या वादामुळे येथील रहिवाशांना याचा त्रास भोगावा लागत आहे.

- पाकिस्तानच्या उरात भरणार धडकी; भारत घेणार 'के-4' मिसाईलची चाचणी

दोन्ही ठिकाणी पावसाचे पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात दोन दोन दिवसांपर्यंत रस्त्यावर तशाच अवस्थेत असते. याकडे प्रशासनाने जातीने लक्ष देऊन येथील समस्येवर तोडगा लवकरात लवकर काढावा, अशी मागणी मुळारोड येथील शिवसेनेचया करुणा घाडगे यांनी नागरिकांच्या वतीने केली आहे.

- Video : देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीविषयी त्यांच्या 'गृहमंत्री' काय सांगतात?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain in Mula road and Khadaki Bazar area of Pune city