पुण्यात पावसाची धुवाधार बॅटींग; वाहतूक ठप्प...

rain11.jpg
rain11.jpg

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात सुरू झालेल्या मान्सून पूर्व पावसाने आज शहराच्या विविध भागात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरातील पेठांमध्ये धुवाधार पाऊस सुरु आहे. तर धनकवडी परिसरात 10 मिनिटे जोरदार पाऊस पडला. औंध, बाणेर रस्ता, बोपोडी, पाषाण, महाळुंगे, सूस परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. 

सिंहगड रस्ता परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंढवा, केशवनगर, खराडी परिसरामध्ये गेल्या पाऊण तासांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर मागील एक तासापासून कात्रज परिसरात पाऊस सुरू असून पावसाचा जोर कमी जास्त होत आहे. लाईट गेलेली असल्याने सर्वत्र अंधार झालेला आहे. रस्त्यावर पाणी साचले आहे. तसेच कल्याणीनगर विमाननगर वडगावशेरी चंदननगर परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे

 खडकीत संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी  सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरवात झाली. फक्त दहा मिनिटातच सगळीकडे रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. खडकी बाजार येथील इंदिरा नगर, दर्गा वसाहत, महादेववाडी झोपडपट्ट्यांमध्ये काही ठिकाणी घरात पाणी शिरले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

औंध, बाणेर रस्ता, बोपोडी, पाषाण, महाळुंगे, सूस परिसरात सायंकाळी सात वाजता पावसाला सुरुवात झाली. पावसाची तिव्रता अधिक असल्याने रस्त्यावर  तुरळक वाहनांची संख्या दिसत होती. काही कामानिमित्त बाहेर पडलेले पावसामुळे तिकडेच अडकून पडले होते. तर अनेक भाजी विक्रेते यांची तारांबळ उडाली. उन्हाने गरम झालेल्या वातावरणात थंडावा निर्माण झाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. पावसाची जोर अजूनही कायम असल्याने रस्त्यावरील वाहतूक  बऱ्या पैकी थांबली आहे.

पुण्यातील या भागात आहे सध्या टॅफिक 
- महात्मा फुले मंडई
- टिळक रस्ता
-भैरोबा नाला पोलिस चौकी
- फातिमानगर
- मगरपट्टा
- ससाणेनगर
- शनिवारवाडा, कसबा पेठ

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com