दमदार पावसामुळे पुणेकर सुखावले 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

पुणे - वळवाच्या पावसाने पुणेकरांना शुक्रवारी दुपारी झोडपले. अचानक पडलेल्या दमदार पावसाच्या सरींमुळे पुणेकर सुखावले. लहान मुलांनी मनसोक्त भिजून पहिल्या पावसाचा आनंद लुटला. संध्याकाळी साडेपाचपर्यंत 25 मिलिमीटर पावसाची नोंद पुण्यात झाली होती. 

शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे दुपारी उकाडा वाढला होता. दुपारी तीनला आकाशात ढगांनी गर्दी केली. खडकवासला परिसरात दुपारी साडेतीनच्या सुमारास दमदार पावसाच्या सरींनी हजेरी लावली. त्यानंतर चारच्यादरम्यान शहराच्या मध्य वस्तीतील पेठांसह उपनगरांमध्ये पावसाच्या सरी पडू लागल्या. 

अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची धांदल उडाली. वाहतूक सिग्नलवर असलेल्या नागरिकांची धावपळ झाली. काही तरुणांनी भिजण्याचा आनंद लुटला; तर पावसाला सुरवात होताच शाळेला सुटी असलेल्या लहान मुलांनी सोसायट्यांच्या आवारात येऊन मनसोक्त भिजत पावसाचे स्वागत केले. 

तासाभराच्या पावसाने शहरातील मुख्य रस्त्यांवरून पावसाच्या पाण्याचे लोंढे वाहू लागले. बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता या परिसरात पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. 

रस्त्यांवरून वाहने घसरली 
पावसाला सुरवात होताच रस्ता काहीसा ओला झाला. रस्त्यांवर सांडलेल्या ऑइलवर पावसाचे पाणी पडल्याने रस्ता निसरडा झाला. त्यातून गाड्या घसरू लागल्या. बाजारीव रस्ता, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता, गणेशखिंड रस्ता या भागात दुचाकीवरून वाहने घसरून पडल्याच्या घटना घडल्याची माहिती मिळाली. पावसाचा जोर वाढल्यानंतर रस्त्यांवरून वाहणाऱ्या पाण्यामुळे रस्ते स्वच्छ झाले. त्यानंतर वाहने सुरक्षितपणे चालविणे शक्‍य झाले. 

हवामान अंदाज 
शहरात येत्या शनिवारी (ता. 2) आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्‍यता आहे. शहर आणि परिसरातील काही भागांत ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. 

Web Title: heavy rain in pune city