esakal | पुण्यात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस; नागरिकांची उडाली तारांबळ

बोलून बातमी शोधा

Heavy rain with thunderstorms in Pune

अचानक जोरदार पाऊस आल्याने दुचाकी वाहन चालकांची मोठी तारांबळ उडालेली दिसत आहे तर, चारचाकी वाहन चालकांना हेडलाईट व इंडिकेटर लावून वाहने चालवावी लागत आहेत. जोरदार पावासामुळे शहारातील काही भागात पाणी साचले आहे. वाहणाऱ्या पाण्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होतो आहे.

पुण्यात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस; नागरिकांची उडाली तारांबळ
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे  : पुण्यात सोमवारी दुपारी 4 पासून शहरातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. शहरात आकाशात काळे ढग दाटून आल्याने काळोख पसरला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. पुणे शहरात सोमवारी (ता. १२) दुपारनंतर आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची वर्तवली होती. त्यानंतर मंगळवार आणि बुधवारी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला आहे. गेल्या आठवड्यात ३९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेला कमाल तापमानाचा पारा ३७ अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल.

​दरम्यान  अचानक जोरदार पाऊस आल्याने दुचाकी वाहन चालकांची मोठी तारांबळ उडालेली दिसत आहे तर, चारचाकी वाहन चालकांना हेडलाईट व इंडिकेटर लावून वाहने चालवावी लागत आहेत. जोरदार पावासामुळे शहारातील काही भागात पाणी साचले आहे. वाहणाऱ्या पाण्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होतो आहे. कामावरून घरी जाणाऱ्या लोकांना देखील पावसामुळे बेहाल झाले. भाजी विक्रेते, हातगाडी वर चहा आणि हॉटेल चालवणाऱ्याचे हाल झाले आहेत. 

हेही वाचा - पुण्यात आणखी एका रुग्णाचा बेड न मिळाल्याने मृत्यू; घरातच घेतला अखेरचा श्वास
 

कोण कोणत्या भागाता पावसाने लावली हजेरी?

 • किरकटवाडी, खडकवासला नांदोशी सणसनगर, नांदेड व आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे.
 • दत्तनगर चौक येथे जोरदार पवासामुळे रस्त्यावर वेगाने पाणी वाहत आहे. 
 • सातारा रस्ता, सहकारनगर, पद्मावती, भागात जोरदार पाऊस सुरू
 • औंध,बोपोडी,विद्यापीठ परिसर, सकाळ नगर,खडकी रस्ता, पंचवटी, पाषाण,सुतारवाडी महाळुंगे,सूस भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. 
 • जांभूळवाडी कोळेवाडी परिसरातही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे
 • कात्रज कोंढवा परिसरात मेघ गर्जनेसह पावसाला सुरुवात
 • सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव, धायरी, नऱ्हे भागात जोरदार पावसाची हजेरी. वादळी वाऱ्याचा देखील जोर वाढला आहे. तसेच विजचा गडगडाट देखील सुरू आहे.
 • दत्तनगर आंबेगावातही वादळासह पाऊस पडतो आहे.
 • बाणेर बालेवाडी इथे ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, वारही सुटलं असून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.
 • आनंद नगर चौकात पावसाचे दृष्य
 • दत्तनगर आंबेगावमध्ये पावसाला सुरुवात
 • रामटेकडी, वैदूवाडी भागात जोरदार पावसाची हजेरी वादळी वाऱ्याचा देखील जोरदार मारा, 
 • कोथरूडमध्ये वादीळी वाऱ्यासह पाऊस सुरू