कोकणात अतिवृष्टीचा इशारा

शास्त्री रस्ता - शहरात गुरुवारी जोराचा पाऊस झाला.
शास्त्री रस्ता - शहरात गुरुवारी जोराचा पाऊस झाला.

मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्‍यता
पुणे - उत्तर मध्य महाराष्ट्रात चक्रवाती स्थितीमुळे राज्यात दमदार पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता. 20) राज्यात सर्वत्र पाऊस हजेरी लावणार असून, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार; तर कोकणातील काही जिल्ह्यांत अतिवृष्टी होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुढील 24 तासांत पावसासह उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर जोराचा वारा वाहणार आहे 22 सप्टेंबरनंतर संपूर्ण राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे. त्यानंतर कोकण, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही विभागांत पाऊस पडणार आहे. तर, इतर विभागांत पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. गेल्या 24 तासांत विदर्भावर हलका ते मध्यम पाऊस; तर मराठवाड्यात काही चांगल्या सरींची नोंद झाली. कोकणच्या काही भागांत जोरदार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि महाबळेश्वर आदी ठिकाणी चांगला पाऊस पडला आहे.

राज्यातील चक्रवाती स्थिती पश्‍चिम दिशेने सरकत आहे. त्यामुळे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पुढील 24 तासांत मध्यम पाऊस हजेरी लावणार आहे. जळगाव, मालेगाव, नाशिक, नगर या जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम सरी बरसणार आहेत; तर ठाणे, डहाणू, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि महाबळेश्वर येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे संकेत हवामान विभागाने वर्तविले आहेत.

प्रमुख शहरांतील 24 तासांतील पाऊस मिमीमध्ये ः
कोकणातील हर्णे 90, वसई 80, मुंबई (सांताक्रूझ), पोलादपूर 70, रत्नागिरी, रोहा 60, बेलापूर (ठाणे), चिपळूण, मुरबाड, संगमेश्वर देवरुख, शहापूर, सुधागड पाली, उल्हासनगर 50. मध्य महाराष्ट्रातील चाळीसगाव 70, श्रीगोंडा, सोलापूर 60, इंदापूर, कडेगाव, खटाव वडूज, फलटण, शिरूर, घोडनाडी, सिन्नर 50. मराठवाड्यातील कन्नड 60, औसा, भोकरदन, गंगाखेड 40, बीड, देगलूर, मालेगाव, उमरगा 30, आंबड, भूम, जालना, कळंब, लोहारा, उस्मानाबाद, फुलांब्री, सोयेगाव 20. विदर्भातील आर्मोरी, धानोरा, गडचिरोली, नागभिड 40, आष्टी, चिखलदरा, चिखली, एटापल्ली, तेल्हारा 30. घाटमाथा परिसरातील कोयना (पोफळी) 120, शिवपुरी, धारावी 40, खांद 30, लोणावळा (टाटा), अम्बोणे 20.

शहरात जोरदार सरींचा अंदाज
पुढील काही दिवस शहरात ढगाळ वातावरण राहणार असून, जोरदार पाऊसही पडणार आहे. पावसामुळे शहरात गारवाही निर्माण झाला आहे. गुरुवारी शहरातील मध्य भागासह उपनगरात हलका ते मध्यम पाऊस पडला आहे. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 5.0 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी (ता. 20) शहर आणि उपनगरातील काही भागांत रात्री जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

शास्त्री रस्ता - शहरात गुरुवारी जोराचा पाऊस झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com