
बारामती : बारामती शहरात काल रात्री दमदार पाऊस झाला. बारामतीत अवघ्या दोन तासात तब्बल 80 मि.मी पावसाची नोंद झाली. या पावसाने बारामतीकरांची पावसाची प्रतीक्षा काही प्रमाणात संपुष्टात आली असली तरी, अशा दमदार पावसाची अजूनही तहानलेल्या भागाला गरज आहे.
बारामती : बारामती शहरात काल रात्री दमदार पाऊस झाला. बारामतीत अवघ्या दोन तासात तब्बल 80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसाने बारामतीकरांची पावसाची प्रतीक्षा काही प्रमाणात संपुष्टात आली असली तरी, अशा दमदार पावसाची अजूनही तहानलेल्या भागाला गरज आहे.
या पावसाने अनेक ठिकाणी शेतात पाणी साठून राहिले आहे, हा पाऊस उपयुक्त असला, तरी असे मोठे पाऊस होण्याची गरज आहे. बारामती शहरात काल झालेल्या पावसाने अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले होते. दरम्यान काल रात्री पडलेल्या पावसाची मिलीमीटर मध्ये नोंद पुढील प्रमाणे झाली.
बारामती - 80, वडगाव निंबाळकर - 90, लोणी भापकर - 89, सुपे - 45, पणदरे - 95, माळेगाव कॉलनी -76, उंडवडी क.प. - 12, मोरगाव - 13, लाटे - 53,
बऱ्हाणपूर - 63, होळ ८ फाटा - 53, सोनगाव - 133, कटफळ - 21, माळेगाव कारखाना - 51, सोमेश्वर कारखाना - 16, जळगांव क.प - 63, मानाजीनगर - 67, चांदगुडेवाडी -15, अंजनगाव - 20, जळगांव सुपे - 36, के.व्ही.के - 50.