पिंपरी-चिंचवडमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस; रस्ते जलमय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

पिंपरी-चिंचवड व परिसरात मंगळवारी (24 सप्टेंबर) दुपारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे शहरवासियांची तारांबळ उडाली असून थेरगाव येथील महापालिकेच्या 'ग' क्षेत्रीय कार्यालयात गुडघाभर पाणी साचले. 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड व परिसरात मंगळवारी (24 सप्टेंबर) दुपारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे शहरवासीयांची तारांबळ उडाली असून थेरगाव येथील महापालिकेच्या 'ग' क्षेत्रीय कार्यालयात गुडघाभर पाणी साचले. 

मंगळवारी सकाळपासून उन होते. पावसाची शक्‍यताही वाटत नव्हती. मात्र, दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान आकाशात ढग दाटून आले. त्यानंतर तीनच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांसह ग्रेडसेपरेटरमध्येही मोठ्याप्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.

थेरगाव येथील 'ग' क्षेत्रीय कार्यालयाच्या तळमजल्यातही पावसाचे पाणी साचले. या मजल्यावरच पाणीकर, मिळतर कर भरण्याचे काऊंटर असून शेजारीच आधार कार्ड नोंदणी केंद्र आहे. दरम्यान, येथे पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy RainFall in Pimpri-Chinchwad