पुण्यात गारांसह मुसळधार पावसाला सुरवात; रस्ते जलमय 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

शहर आणि परिसरात येत्या शुक्रवारपर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्‍यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यात पुन्हा शुक्रवारपर्यंत (ता. 8) मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस होईल, असा इशारा हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. शनिवारी (ता. 9) आकाश मुख्यत: निरभ्र राहील, असा अंदाज आहे. 

पुणे : शहर आणि उपनगरांमधील भागात सोमवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. काही भागात गारांसह मुसळधार पाऊस होत आहे. सायंकाळी पाच वाजल्यापासूनच आकाशात काळे ढग जमण्यास सुरवात झाली. त्यामुळे पावसाचा अंदाज घेत अनेकांनी घर आणि कार्यालय गाठले. परंतु बाजारात ग्राहकांची मोठी तारांबळ उडाली.

मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात शुक्रवारपर्यंत मुसळधार!
शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमधील वडगावशेरी, नगर रस्ता, मुंढवा, केशवनगर, सातारा रस्ता, वाकडेवाडी मुळा रस्ता परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. कात्रज, सहकारनगर आणि बिबवेवाडी परिसरात गारांसह जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे रस्ते जलमय झाले. त्यामुळे वाहनधारकांना मार्ग काढताना कसरत करावी लागत होती. 

Rain in pune

पुण्यात शुक्रवारपर्यंत बरसणार 
शहर आणि परिसरात येत्या शुक्रवारपर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्‍यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यात पुन्हा शुक्रवारपर्यंत (ता. 8) मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस होईल, असा इशारा हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. शनिवारी (ता. 9) आकाश मुख्यत: निरभ्र राहील, असा अंदाज आहे. 

 rain in pune

पुणेकरांनो, पाणी जपून वापरा कारण..

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains begin with hail in Pune