मुसळधार पावसाने पवना परिसर जनजीवन विस्कळित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

 पवनानगर परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाचा जोर काल सायंकाळी वाढला आणि पवना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. आज दिवसभरात अजिबात पाऊस थांबला नाही  परिसरात भात खाचरे, ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

पवनानगर : पवनानगर परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाचा जोर काल सायंकाळी वाढला आणि पवना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. आज दिवसभरात अजिबात पाऊस थांबला नाही  परिसरात भात खाचरे, ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत.
  
पवना परिसरातील रस्त्यांवर पाणी साचले होते ठिकठिकाणी रस्ते खचले  आहेत 
जोरदार पावसामुळे परिसरातील बससेवा विस्कळीत झाली होती तसेच शनिवार असल्याने तुरळक प्रमाणात गर्दी झाली होती.

पवना धरण परिसरात आज दिवसभरात १११ मी.मी पाऊस झाला धरणसाठ्यात दमदार वाढ झाली  सायंकाळी पाचपर्यंत ५८.८३% धरण भरले होते काल सहा वाजलेपासुन पाणीसाठ्यात  १०% वाढ झाली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains disrupted Life of Pawna area