भुशी धरण झाले फुल्ल; पर्यटकांनो, चला लोणावळ्याला!

Bhushi Dam Lonavala
Bhushi Dam Lonavala

लोणावळा : पावसाळी पर्यटनासाठी उत्सुक असलेल्यांसाठी एक चांगली बातमी आहे. लोणावळा परिसरात सध्या संततधार सुरू असून पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र असलेले भुशी धरण 'ओव्हर फ्लो' झाले आहे.

या परिसरात आज (सोमवार) सकाळपर्यंत ५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत येथे एकूण ७३८ मिलोमीटर पाऊस झाला आहे. 

यंदा पाऊस लांबल्याने भुशी धरण भरले नव्हते. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला होता. पण गेले पाच दिवस लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. भुशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्ल्याने आज हे धरण शंभर टक्के भरले. यामुळे धरणाच्या सांडव्यावर वर्षा विहारासाठी येया शनिवारी-रविवारी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com