नसरापूर परिसरात अतिवृष्टी; प्रचंड नुकसान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

बुधवारी रात्री झालेल्या प्रंचड पावसाने नसरापूर परिसरात मोठे नुकसान झाले असून, शिवगंगा नदीवरील केळवडे येथील बंधारा फुटला आहे. केळवडे गावामध्ये पाणी शिरुन शेती वाहून गेली आहे.

नसरापूर : बुधवारी रात्री झालेल्या प्रंचड पावसाने नसरापूर परिसरात मोठे नुकसान झाले असून, शिवगंगा नदीवरील केळवडे येथील बंधारा फुटला असून, केळवडे गावामध्ये पाणी शिरुन शेती वाहून गेली आहे. दोन वाहने देखिल वाहून गेली आहेत  
रात्रीच्या सुमारास झालेल्या या पावसाने नसरापूर, केळवडे, साळवडे, कांजळे, वरवे या गावात शिवगंगा नदीच्या पाण्याने परिसरातील शेतीची पुर्ण वाताहत झाली आहे.

केळवडे येथील ग्रामपंचायतीची कचरयासाठीची घंटागाडी तसेच दत्तात्रेय जगताप यांची मारुती गाडी व काही जनावरे वाहून गेल्याची माहीती नागरीकांनी दिली आहे. गावची स्मशानभुमी देखील वाहून गेली आहे. नदी किनारीची शेतीतील माती पुर्ण वाहुन जावून शेतीची रुपांतर मोठमोठ्या खड्ड्यात झाले असुन या प्रचंड नुकसानीने शेतकरी हवालदील झाले आहे.

शेतकरी स्वप्निल कडू यांनी सांगितले की, आमची नदी किनारीची शेती शेतीच राहीला नसून माती पुर्ण वाहून जाऊन खालील खडक दिसू लागला आहे. प्रथमदर्शनी आलेली ही माहीती असून, अजुन मोठ्या नुकसानीची माहीती मिळण्याची शक्यता आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in Nasrapur area; Huge damage

टॅग्स