धुंवाधार पावसाचा पुण्यात दोन तासांत धुमाकूळ!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 September 2020

सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास अंधारून आले. त्यावेळी पाऊस आता मोठा पडेल, अशी लक्षणे दिसत होती. त्यामुळे रस्त्यांवरून सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली. परिणामी रस्त्यावरील वर्दळही मंदावली. दोन वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू झाला. काही वेळातच तो मुसळधार झाला. त्याचा तडाखा इतका जोरात होता की, रस्त्यावरील परिस्थिती नाले-ओढ्यांसारखी झाली.

पुणे : शहरात सुमारे दोन तासांत पडलेल्या पावसाने पुणेकरांची सोमवारी दुपारी त्रेधातिरपीट उडविली. अनेक ठिकाणच्या रस्त्यांना नाले-ओढ्यांचे स्वरूप आले होते तर, अनेक ठिकाणी अक्षरशः तळी साचली होती. दरम्यान, पुण्यात मंगळवारीही पाऊस पडेल, असे वेधशाळेने म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास अंधारून आले. त्यावेळी पाऊस आता मोठा पडेल, अशी लक्षणे दिसत होती. त्यामुळे रस्त्यांवरून सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली. परिणामी रस्त्यावरील वर्दळही मंदावली. दोन वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू झाला. काही वेळातच तो मुसळधार झाला. त्याचा तडाखा इतका जोरात होता की, रस्त्यावरील परिस्थिती नाले-ओढ्यांसारखी झाली.

 आरोग्य सुविधांचे ‘ऑपरेशन’ गरजेचे! 

बिबबवेवाडी, महेश सोसायटी चौक, आरटीओ चौक, पद्मावती, ताडीवाला रस्ता, महात्मा फुले मंडई, स्वारगेट, बुधवार पेठ, सिंहगड रस्ता, विश्रांतवाडी, औंध, बाणेर, बालेवाडी आदी सर्वच ठिकाणी पावसाने तडाखा दिला होता.

सुमारे साडेचार वाजेपर्यंत पावसाचा तडाखा कायम होता. पावणे पाचच्या सुमारास पाऊस उघडला आणि सायंकाळी पाचच्या सुमारास तर चक्क लख्ख उन पडले. मात्र, रस्त्यावरील जागोजागी पाण्याचे लोट कायम होता. या दोन तासांत शहरात झाडे पडल्याच्या 12 तर, पाणी साठल्याच्या 16 तक्रारी अग्निशामक दलाकडे आल्या. सायंकाळी पाच वाजल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत झाली.

'पुण्यात 20 IAS अधिकारी तरी उपयोग होईना आता...'; कोरोना रोखण्यासाठी गिरीष बापट यांचा सल्ला​

पावसाच्या या तडाख्याने शहराच्या काही भागांतील वीज पुरवठा खंडित झाला होता. रविवारी सायंकाळी सहा ते साडेसात दरम्यान तुफान पावसाने पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळविले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

Video : संडे हो या मंडे रोज खायचे साडेसहा रुपयाचे अंडे


दरम्यान, वेधशाळेच्या म्हणण्यानुसार मंगळवारीही पुणे आणि परिसरात पावसाची शक्‍यता आहे. राज्यात मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात येत्या 48 तासांत पाऊस पडणार असल्याचेही वेधशाळेने म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in Pune in two hours