Pune Rain : पुण्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 October 2019

काही झाडांच्या फांद्याही तुटून रस्त्यावर पडल्या आहेत. तेथेच जवळ उभ्या केलेल्या एका चारचाकी गाडीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला आहे. 

पुणे : विजयादशमीच्या दिवशी पावसाने पुणे शहर आणि परिसरात हजेरी लावली. काही वेळासाठी आलेल्या पावसाने लोकांची चांगलीच भंबेरी उडाली होती. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला, तर शहराच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत.

खडकी बाजार परिसरात मुसळधार पाऊस झाला. मात्र, काही मिनिटानंतर पावसाने उघडीप घेतली. तसेच विमान नगर आणि वडगाव शेरी परिसरातही जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे विमान नगरमध्ये तीन ठिकाणी मोठी झाडे पडली.

Image may contain: tree, plant, outdoor and nature

काही झाडांच्या फांद्याही तुटून रस्त्यावर पडल्या आहेत. तेथेच जवळ उभ्या केलेल्या एका चारचाकी गाडीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला आहे. 

महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोसळलेल्या झाडाखालूनही काही नागरिक आपली वाहने घेऊन जात आहेत. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत महापालिकेतील कोणतीही टीम घटनास्थळी पोहोचलेली नव्हती.

Image may contain: tree, house, sky, table, outdoor and nature

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- इचलकरंजीत डोक्यात दगड घालून युवकाचा खून

- Vidhan Sabha 2019 : खडसे म्हणतात, 'राज्यात महाआघाडीचे सरकार येणार'

- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल : सुशिलकुमार शिंदे (व्हिडिओ)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains with thunderstorms in some parts of Pune city

Tags
टॉपिकस