मुंबई-पुणे प्रवास आज टाळाच; द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ टँकर घसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून, संथ गतीने सुरू आहे. बोरघाट पोलीस, खंडाळा वाहतूक पोलिस घटनास्थळी असून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे.

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ टँकर घसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून, संथ गतीने सुरू आहे. बोरघाट पोलीस, खंडाळा वाहतूक पोलिस घटनास्थळी असून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे.

द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. विशेषतः पुण्याकडे येणारी वाहतूक गेले दोन तास विस्कळीत झाली आहे. बोरघाटातील वाहनांची रांग आडोशी बोगद्यपर्यंत गेल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे. शनिवार-रविवार सुट्टीचे नियोजन पुण्यातून ये-जा करणारे प्रवासी वाहतूक कोंडीत अडकले आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy traffic jam on Mumbai Pune expressway