पुणे : इंदापूर टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

पुणे सोलापूर महामार्गावरील सरडेवाडी तालुका इंदापूर येथील टोल नाक्यावर शनिवार (ता. १९) रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सुमारे अर्धा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

वालचंदनगर (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील सरडेवाडी तालुका इंदापूर येथील टोल नाक्यावर शनिवार (ता. १९) रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सुमारे अर्धा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

दरम्यान, टोल पास करण्यासाठी प्रवाशांना किमान अर्धा तास वेळ लागत होता. परिसरात पाऊस सुरू आहे. त्यामुळे लांबच्या पल्ल्यावरील प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. टोल नाक्यावरील व्यवस्थापनाने याबाबत कोणतेही पाऊल उचलले नाही.

याबाबत टोल नाका व्यवस्थापनाचे सुपरवायझर यांच्याशी संपर्क साधला असता, दररोज सकाळी हेवी ट्रॅफिक असल्याचे सांगितले. मात्र कॅमेरे पुढे प्रतिक्रिया देण्याचे टाळून मॅनेजरच्या प्रतिक्रिया घेण्यास सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy traffic near indapur tollnaka