आळंदीत उद्यापासून अवजड वाहनांना बंदी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

आळंदी - कार्तिकी वारीमुळे औद्योगिक भागातून आळंदीत येणारी अवजड आणि चारचाकी वाहतूक शुक्रवारपासून (ता. ३०) पूर्णपणे बंद राहील. मरकळ औद्योगिक भागात जाणारी अवजड वाहतूक पुणे आळंदीमार्गे न नेता पुणे-नगर महामार्गावरून वाघोली लोणीकंदमार्गे वळविली जाणार आहे. वारी काळात शहरातील धर्मशाळांपुढे रस्त्यावर वाहने उभे करण्यास बंदी राहणार आहे, अशी माहिती आळंदीचे पोलिस निरीक्षक रवींद्र चौधर यांनी दिली.

चौधर यांनी सांगितले, की इंद्रायणी नदी परिसर, प्रदक्षिणा मार्ग, गोपाळपुरा, चाकण चौकातील भुरट्या चोऱ्या आणि पाकीटमारांवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. छेडछाड रोखण्यासाठी महिला बीट मार्शलची नेमणूक करण्यात येणार असून महिला बिट मार्शल राहुट्या, धर्मशाळांमध्ये महिला वारकऱ्यांची छेडछाड होऊ नये, यासाठी लक्ष ठेवतील. वारी काळात दोन सत्रांत पोलिसांचा बंदोबस्त राहील. मंदिर आणि परिसरात शंभर पोलिसांचा बंदोबस्त तर महाद्वार, पंखा मंडपात महिला पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. इंद्रायणीकाठी आणि प्रमुख चौकात संशयास्पद हालचाली टिपण्यासाठी स्वतंत्र पोलिसांची नेमणूक केली आहे. शहरात सीसीटीव्ही यंत्रणेसाठी तीस कॅमेरे बसविले आहेत.

२ - सहायक पोलिस आयुक्त 
१५ - पोलिस निरीक्षक 
८० - सहायक पोलिस निरीक्षक, फौजदार  
११७० - पोलिस कर्मचारी (महिला/पुरुष)  
६०० - होमगार्ड

Web Title: heavy Vehicle ban in Alandi