पिंपरी-चिंचवड शहरात केवळ ३८ टक्केच हेल्मेटधारक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

शहरातील दुचाकीस्वारांमध्ये हेल्मेटवापराबाबत जागरूकता नसल्याचे परिसर संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात आढळले आहे. संस्थेने शहरात सात वेगवेगळ्या ठिकाणी पाहणी केली. त्यात चार हजार ७०५ दुचाकीस्वार व सहप्रवाशांची नोंद झाली. त्यातील केवळ एक हजार ८२७ अर्थात ३८ टक्के नागरिकांनीच हेल्मेट घातल्याचे दिसून आले.

पिंपरी - शहरातील दुचाकीस्वारांमध्ये हेल्मेटवापराबाबत जागरूकता नसल्याचे परिसर संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात आढळले आहे. संस्थेने शहरात सात वेगवेगळ्या ठिकाणी पाहणी केली. त्यात चार हजार ७०५ दुचाकीस्वार व सहप्रवाशांची नोंद झाली. त्यातील केवळ एक हजार ८२७ अर्थात ३८ टक्के नागरिकांनीच हेल्मेट घातल्याचे दिसून आले. 

‘परिसर’ संस्थेने रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त सर्वेक्षण केले. अप्पूघर-निगडी, डांगे चौक-थेरगाव, हिंजवडी चौक, कस्पटे चौक-वाकड, नाशिक फाटा, टाटा मोटर्स चौक-पिंपरी, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चौक-चिंचवड हे सात चौक निवडले. सकाळी जास्त रहदारीच्या वेळी दोन हजार ६९९ व दुपारी कमी रहदारीच्या वेळी एक हजार २५१ वाहनांची नोंदणी केली. परिसर संस्थेचे संदीप गायकवाड म्हणाले, ‘‘पोलिसांनी हेल्मेट न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. त्यामुळे अपघातांमध्ये हेल्मेटअभावी होणाऱ्या मृत्यूंची संख्या 
कमी होईल.’’

Web Title: Helmet Pimpri Chinchwad