प्रियजनांवर प्रेम करताय! हेल्मेट वापरा - आपटे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019

पुणे - ‘मी पुण्याची असून पुण्याविषयी मला नेहमीच प्रेम आहे. मात्र, हेल्मेट न घातल्याने अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या मोठी आहे. हे रोखण्यासाठी हेल्मेट घालणे आवश्‍यक आहे. सुरक्षित प्रवास ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. आपल्या प्रियजनांवर प्रेम असेल तर हेल्मेट आवश्‍य वापरा,’’ असा सल्ला प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटे हिने दिला आहे. 

बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्सने Caringly Yours या त्यांच्या नव्या ब्रॅंडचे अनावरण प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटे हिच्या उपस्थितीत केले. कोरगाव पार्कमधील अतिशय ट्रॅफिकच्या ठिकाणी दीड हजार हेल्मेटचा वापर करून बनविलेली टॅग लाइन प्रसिद्ध करण्यात आली. ‘टॅगलाइन’ सादर करण्यासाठी ‘व्हॅलेंटाइन डे’ मुद्दाम निवडण्यात आला. ‘जर तुम्ही तुमच्या प्रियजनांवर प्रेम करत असाल, तर हेल्मेट घालून तुमची काळजी दाखवा’ हा संदेश या निमित्ताने देण्यात आला. 

बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्सचे अध्यक्ष संजीव बजाज, बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ तपन सिंघल, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, राधिका यांच्या उपस्थितीत सुरक्षित वाहन चालविण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणाऱ्या या होर्डिंगचे अनावरण करण्यात आले. 

बजाज म्हणाले, ‘‘ग्राहककेंद्री विमा कंपनी ही ओळख होण्याच्या दिशेने बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्सची बांधणी करत आहोत.’’

सिंघल म्हणाले, ‘‘आम्ही लोकांच्या सुरक्षेची काळजी करतो त्यामुळे आम्हाला असे वाटले, की नव्या ब्रॅंडच्या अनावरणप्रसंगी हेल्मेट घालण्याचे महत्त्व आम्ही अधिक लोकांपर्यंत पोचवावे.’’

वेंकटेशम म्हणाले, ‘‘सर्वाधिक दुचाकी पुण्यात आहेत. हेल्मेट न घातलेल्या व्यक्‍तीच रस्ते अपघातांत सर्वाधिक बळी पडतात.’

Web Title: Helmet Use Radhika Apte