पुण्यात सरकारी कर्मचाऱ्यांना आजपासूनच हेल्मेटसक्‍ती

पुण्यात सरकारी कर्मचाऱ्यांना आजपासूनच हेल्मेटसक्‍ती

पुणे - सरकारी आणि निमसरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मंगळवार (ता. २०) पासूनच हेल्मेटसक्‍ती करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात औद्योगिक कंपन्या आणि खासगी संस्थांमधील कर्मचाऱ्यांना आणि त्यानंतर एक जानेवारीपासून सर्व दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्‍ती करण्यात येणार असल्याची माहिती सह पोलिस आयुक्‍त शिवाजी बोडखे यांनी दिली. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
पोलिस आयुक्‍त के. व्यंकटेशम यांनी शहरात एक जानेवारीपासून हेल्मेटसक्‍ती करणार असल्याचे जाहीर केले होते; परंतु याबाबत नाराजीचा सूर व्यक्त करण्यात येत होता. या विरोधाची धार बोथट करण्यासाठी पोलिसांनी सुरवातीला सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट सक्‍तीचे पाऊल उचलले आहे. 

बोडखे म्हणाले, ‘‘उद्यापासून शहरातील पोलिसांसह केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर बंधनकारक राहील. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हेल्मेट वापरल्यास अन्य नागरिकही त्याचा वापर सुरू करतील.’’ 

पोलिसांसह सर्वच सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नियम, कायदे पाळणे आवश्‍यक आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांपासून हेल्मेट सक्‍तीची अंमलबजावणी करण्यात येईल. त्यानंतर औद्योगिक आणि इतर खासगी संस्थांच्या आस्थापनांना त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांना हेल्मेट परिधान करण्याबाबत सांगण्यात येईल. नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्या आस्थापनाच्या प्रमुखांना कळविण्यात येईल. 
- शिवाजी बोडखे, सह पोलिस आयुक्‍त 

शहरात दुचाकी वाहनांच्या गतीचा वेग कमी आहे. नियमांवर बोट ठेवून हेल्मेटसक्‍ती योग्य नाही. रस्ते अपघात टाळण्यासाठी मापदंड निकषांनुसार रस्ते आणि पायाभूत सुविधा उभारणे गरजेचे आहे. कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी करताना सरकारी कर्मचाऱ्यांना ‘लक्ष्य’ केले जाते. 
- लक्ष्मीकांत पाचारणे, राज्य अध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना

हेल्मेट विरोधी कृती समितीची आज बैठक
हेल्मेट सक्‍तीबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी (ता. २०) सकाळी ११ वाजता आनंदऋषीजी ब्लड बॅंकेच्या सभागृहात बैठक होणार आहे. या वेळी पुढील दिशा ठरविण्यात येईल, अशी माहिती हेल्मेट विरोधी कृती समितीच्या वतीने देण्यात आली.

पुणे शहरातील सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या - सुमारे १ लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com