फुगेवाडी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

महत्त्वाच्या घटना 
४ मे - कासारवाडी येथे सीमाभिंत कोसळली
३ जून - मोरवाडी येथे लिफ्टमध्ये व्यक्ती अडकल्या
२७ जून - चिखलीत लिफ्टमध्ये व्यक्ती अडकल्या 
१५  जुलै - पिंपळे निलख, चिंचवडगावात महिला घरात अडकली
११ सप्टेंबर - आकुर्डी जिजामाता चौकात इमारतीच्या आगीत नागरिक अडकले
१९ सप्टेंबर - चिखली महादेवनगर येथे भिंत कोसळली
२१ सप्टेंबर - पिंपरी येथे खड्ड्यात अडकलेली म्हैस बाहेर काढण्यात यश
२४ सप्टेंबर - थेरगाव येथे खड्ड्यात पडलेल्या गाईचा जीव वाचविण्यात यश

फुगेवाडी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या फायरमन विशाल जाधव यांच्या कुटुंबीयांना अपघाती विम्यापोटी एकूण २० लाख रुपये मिळणार आहेत, तर पत्नीला अनुकंपा तत्त्वावर पालिकेत रुजू केले जाणार आहे. तसेच मृत मजूर नागेश जमादार याच्या कुटुंबाला दोन लाख रुपये एवढी विमा रक्कम मिळू शकणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप 

अग्निशामक विभागात धोकादायक स्वरूपाचे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे विमा उतरविण्यात आला आहे. त्याअंतर्गत जाधव यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये एवढी रक्कम मिळणार आहे.

Video : फायरमन विशाल जाधव यांना शहीदाचा दर्जा हवाच

राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना संबंधित कुटुंबाला दहा लाख रुपये अशी एकूण २० लाख रुपयांची रक्कम विम्यापोटी मिळणार आहे. ठेकेदाराने उतरविलेल्या विम्यामधून नागेश जमादारला दोन लाख रुपये मिळणार आहे. ठेकेदाराकडून जास्तीत जास्त मदत कुटूंबियाला देण्यासाठी प्रयत्न केले जातील.

फुगेवाडी दुर्घटनेत ठेकेदाराचा निष्काळजीपणाच; अप्पर तहसीलदार कार्यालयाचा ठपका

पुरेशा संख्येअभावी जवानांची कसरत
शहरात आगीच्या घटनेसह बचाव व अतिजोखमीच्या दररोज सरासरी सात ते आठ घटना घडत आहेत. पुरेशा मनुष्यबळाअभावी जवानांना रोज तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरात जानेवारी ते ऑक्‍टोबर या दहा महिन्यांत लहान-मोठ्या ९७३ दुर्घटना शहरात घडलेल्या आहेत.

Video : मजूराचा पाय बाहेर खेचणार तेवढ्यात आम्ही देखील गाडले गेलो....

द्विसदस्यीय समिती करणार चौकशी
फुगेवाडी येथे रविवारी (ता. १) झालेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी शहर अभियंता राजन पाटील आणि सहशहर अभियंता मकरंद निकम या दोघांची चौकशी समिती नेमली आहे. ही द्विसदस्यीय समिती सखोल चौकशी करून सविस्तर अहवाल देणार आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या जवानाच्या पाठीशी महापालिका असून, कुटुंबाला आर्थिक मदत केली जाणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. घटनेत प्रथम दर्शनी कंत्राटदार दोषी असल्याचे दिसून येत आहे. त्याच्याकडून लेखी खुलासा मागविला असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

पुणे : 'त्याने' दोघांना वाचवले पण स्वत:..(व्हिडिओ)

या वर्षातील दुर्घटना
जानेवारी    १०६ 
फेब्रुवारी    १०७
मार्च    १५६
एप्रिल    १४६
मे    ११८
जून    ९७
जुलै    ७४
ऑगस्ट    ५१
सप्टेंबर    ६७
ऑक्‍टोबर    ५१ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Help for the families of the deceased in the Fugewadi accident